मुंबई 27 जून : मुंबईतील मीरा रोड हत्याकांडात नवनवे खुलासे होत आहेत. आता पोलिसांना पीडित सरस्वती वैद्य हिच्या मोबाईलवरून महत्त्वाचा सुगावा लागला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सरस्वती वैद्य हिला आरोपी मनोज सानेसोबतचे प्रेमसंबंध संपवायचे होते. सरस्वती वैद्य यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सवरून ही बाब उघड झाली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26-27 मे रोजी पीडित सरस्वती वैद्य हिने तिच्या मोबाईलवरून आरोपी मनोज सानेला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला होता. यात लिहिलं होतं, की ‘तू माझा विश्वास तोडला आहेस… तू माझा विश्वासघात केला आहेस, म्हणून मी तुझ्याशी हे नाते संपवत आहे. सरस्वती वैद्य यांनी आरोपी मनोज सानेला हत्येच्या 7 दिवस आधी हा मेसेज पाठवला होता. Mumbai Mira Road Murder : सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे उकळले, प्रेशर कुक केले अन् तळलेही; सेक्स अॅडिक्ट साने असं का वागला? मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेसेजनंतर आरोपी मनोज साने अस्वस्थ झाला होता. या मेसेजनंतर एकाच फ्लॅटमध्ये राहात असतानाही दोघांमध्ये फार कमी बोलणं होत होतं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी सरस्वती वैद्य यांनी आरोपी मनोज साने याला इतर महिलांसोबत चॅटिंग करताना रंगेहात पकडलं. यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली. त्याच दिवशी रात्री आरोपी मनोज साने याने बेडरूममध्ये घुसून सरस्वती वैद्य यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण सरस्वतीने त्याला बाहेर ढकलून दार बंद केलं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर आरोपीचं चारित्र्य अत्यंत वाईट असून सरस्वती वैद्य यांना त्याच्यासोबत राहायचं नव्हतं, हे स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे मुंबईतील मीरा रोड हत्याकांडप्रकरणी पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपी मनोज सानेच्या मोबाईलवरूनही मुंबई पोलिसांना अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज सानेने OTT वर वेब सिरीज पाहिल्यानंतर त्याची लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य हिच्या हत्येचा कट रचला होता. यासोबतच श्रद्धा हत्याकांडाचाही आरोपी मनोज साने याच्यावर प्रभाव होता. मात्र, सरस्वतीला मारण्यापूर्वी त्याने एक वेब सिरीज पाहिली आणि त्या आधारे त्याने हत्येचा कट रचला. हत्येनंतर सानेनं सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीही अनेवळा गुगलवर सर्च करुन माहिती घेतली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







