नेहाल भुरे, भंडारा 16 ऑक्टोबर : गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातील अनेक घटना तर अशाही असतात, ज्यात अतिशय क्षुल्लक कारणावरुन एखाद्याची हत्या केली जाते. अशीच एक हादरवणारी घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. यात चोरीच्या उद्देशाने मैत्रिणीच्या घरी आलेल्या एका तरुणीने मैत्रिणीच्या आजीची हत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. वर्ध्यात कॉलेजबाहेरच रंगला खुनाचा थरार; जुन्या वादातून घेतलेल्या भयानक बदल्याने खळबळ ही घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भीलेवाडा येथे घडली आहे. . यात तरुणीने 80 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केली. तुळजाबाई सुर्यभान गोस्वामी असं 80 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलेची हत्या करणारी ही आरोपी मुलगी मृत महिलेच्या नातीची मैत्रीण होती. ही मुलगी चोरी करण्याच्या उद्देशाने मैत्रिणीच्या घरी आली होती. चोरी करण्यासाठी ती लोखंडी कपाट फोडत असताना त्याचा आवाज झाला. यावेळी वृद्ध महिला तुळजाबाई यांना जाग आली. त्यांनी या मुलीला चोरी करण्यापासून अडवलं आणि विरोध केला. यावरुनच दोघींमध्ये हातापायी झाली. यातच अल्पवयीन मुलीने वृद्ध महिलेची हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मुलीने घटनास्थळावरुन पळ काढला. कारधा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. रुग्णालयाच्या छतावर आढळले 200 कुजलेले मृतदेह; शरीराचे अवयव अन् कपडेही गायब, पाकिस्तानात खळबळ वर्ध्यात कॉलेजबाहेर तरुणाची हत्या - वर्ध्यातूनही हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. ही घटना वर्ध्याच्या देवळी येथे एका कॉलेजच्या जवळ घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्गेश शेंडे असं या घटनेत मृत्यू झालेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.