जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / रुग्णालयाच्या छतावर आढळले 200 कुजलेले मृतदेह; शरीराचे अवयव अन् कपडेही गायब, पाकिस्तानात खळबळ

रुग्णालयाच्या छतावर आढळले 200 कुजलेले मृतदेह; शरीराचे अवयव अन् कपडेही गायब, पाकिस्तानात खळबळ

फाईल फोटो

फाईल फोटो

अनेकांच्या शरीराचे अवयव गायब असून महिलांचे मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निश्तार हॉस्पिटलच्या छतावरील खोलीत शेकडो सडलेले मृतदेह होते

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

इस्लामाबाद 15 ऑक्टोबर : पाकिस्तानातील मुलतान शहरातून एक भयानक घटना समोर आली आहे. मुलतान शहरातील एका रुग्णालयाच्या छतावर किमान 200 कुजलेले मृतदेह आढळून आले आहेत. ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजने दावा केला आहे की हे कुजलेले मृतदेह शुक्रवारी मुलतानमधील निश्तार हॉस्पिटलच्या शवागाराच्या टेरेसवर सापडले. त्यानंतर सरकारने या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. यात अनेकांच्या शरीराचे अवयव गायब असून महिलांचे मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निश्तार हॉस्पिटलच्या छतावरील खोलीत शेकडो सडलेले मृतदेह होते. मात्र, आतापर्यंत मृतदेहांच्या संख्येबाबत कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने याला दुजोरा दिलेला नाही किंवा हे वृत्त नाकारलंही नाही. अंधश्रद्धेतून जोडप्याने घेतले 2 महिलांचे बळी; मग मांस कापून खाल्लं, देशाला हादरवणारी घटना जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानस्थित पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार तारिक जमान गुर्जर यांनी सांगितलं की, एका व्यक्तीने त्यांना निश्तार हॉस्पिटलच्या शवागाराच्या टेरेसवर मृतदेह कुजल्याची माहिती दिली. ते म्हणाले, ‘मी निश्‍तार हॉस्पिटलला भेट देण्यासाठी गेलो होतो, तेव्हाच एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि म्हणाला की, तुम्हाला काही चांगलं काम करायचं असेल तर शवागारात जाऊन तपासणी करा.’ जमान गुर्जन यांनी सांगितलं की, ते तेथे पोहोचले असता कर्मचारी शवागाराचा दरवाजा उघडण्यास तयार नव्हता. ते म्हणाले, ‘यानंतर मी त्यांना धमकी दिली की, जर दरवाजा उघडला नाही तर मी तुमच्याविरुद्ध एफआयआर दाखल करेन.’ ते म्हणाले की, अखेर शवगृह उघडले आणि आत जाताच त्यांना सुमारे 200 मृतदेह पडलेले दिसले. त्यात स्त्री-पुरुष दोघांचेही कुजलेले मृतदेह होते आणि तेही विवस्त्र अवस्थेत. महिलांचे शरीरही झाकलेले नव्हते. अंडा करीसाठी आईचा जीवच घेतला; आधी डोकं भिंतीवर आपटलं नंतर रॉडने संपवलं यानंतर गुर्जनने डॉक्टरांना येथे काय चालले आहे, असे विचारले असता, वैद्यकीय विद्यार्थी अभ्यासासाठी याचा वापर करतात, असे उत्तर डॉक्टरांनी दिले. त्यांनी शवागार अधिकाऱ्यांना विचारले की तुम्ही मृतदेह विकता का? गुर्जर म्हणाले की त्यांनी डॉक्टरांना या घटनेचे स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आणि प्रत्युत्तरात डॉक्टरांनी सांगितलं की हे प्रकरण जसं दिसत आहे, तसं काहीच नाही. कारण या मृतदेहांचा वैद्यकीय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक हेतूसाठी वापर केला होता. ५० वर्षांच्या इतिहासात असं कधीच पाहिलं नसल्याचं ते म्हणाले. गिधाडं आणि किडे छतावरील ही प्रेतं खात होती. गुर्जर म्हणाले की, या मृतदेहांचा वापर वैद्यकीय शिक्षणासाठी केला जात असला तरी नमाज-ए-जनाजेनंतर मृतदेहांचं दफन योग्य प्रकारे व्हायला हवं होतं, परंतु ते अशाप्रकारे टेरेसवर फेकले गेले, हे चुकीचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात