जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वर्ध्यात कॉलेजबाहेरच रंगला खुनाचा थरार; जुन्या वादातून घेतलेल्या भयानक बदल्याने खळबळ

वर्ध्यात कॉलेजबाहेरच रंगला खुनाचा थरार; जुन्या वादातून घेतलेल्या भयानक बदल्याने खळबळ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

देवळीच्या आय. टी. आय कॉलेजजवळ दुर्गेश शेंडे हा आपल्या मित्रांसोबत बसला होता. याचवेळी दोन युवकांनी तिथे येत दुर्गेशला मारहाण करण्यास सुरुवात केली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा 16 ऑक्टोबर : वर्ध्यातून हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. ही घटना वर्ध्याच्या देवळी येथे एका कॉलेजच्या जवळ घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुर्गेश शेंडे असं या घटनेत मृत्यू झालेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवळीच्या आय. टी. आय कॉलेजजवळ दुर्गेश शेंडे हा आपल्या मित्रांसोबत बसला होता. याचवेळी दोन युवकांनी तिथे येत दुर्गेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तरुणावर चाकूने वारही केले. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पुण्यात दोघांची हत्या करून वाशिम गाठलं अन् जंगलात लपला; चाकण पोलिसांनी सिनेस्टाईल पकडलं जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. ही घटना देवळी येथे आयटीआय कॉलेजजवळ घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अवघ्या दोन तासाच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली. वैभव दुरगडे आणि शुभम मातकर अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. समोर आलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबरला देवळीच्या मिरननाथ मंदिर परिसरातील पानठेल्याजवळ आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद झाला होता. याचाच राग डोक्यात ठेवत आरोपींना दुर्गेशची हत्या केली. एकतर्फी प्रेमातून सुरक्षारक्षकाचं उद्यानातच महिलेसोबत धक्कादायक कृत्य, वर्ध्यातील घटनेनं खळबळ चाकणमध्ये दुहेरी हत्याकांड - चाकण येथूनही दुहेरी हत्याकांडाची एक घटना नुकतीच समोर आली होती. या प्रकरणात आरोपी चाकणमध्ये दोघांची हत्या करून वाशिममधील जंगलात फरार झाला होता. मात्र, अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला वाशिममधून अटक केली. प्रदीप दिलीप भगत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. बिल्डिंगमध्ये येवू न दिल्याच्या रागातून आरोपीने दोन जणांचा खून केला असल्याची बाब समोर आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात