मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नरभक्षक व्यक्तीच्या फ्लॅटमधून हजारो मानवी हाडे जप्त, बेपत्ता व्यक्तींचे ओळखपत्र अन् कपडेही आढळले

नरभक्षक व्यक्तीच्या फ्लॅटमधून हजारो मानवी हाडे जप्त, बेपत्ता व्यक्तींचे ओळखपत्र अन् कपडेही आढळले

आरोपीच्या घरात मानवी हाडे सापडल्याची बातमी आगीसारखी पसरली आहे. येथे उत्खननानंतर पोलिसांनी 3,787 मानवी हाडे जप्त केली आहेत.

आरोपीच्या घरात मानवी हाडे सापडल्याची बातमी आगीसारखी पसरली आहे. येथे उत्खननानंतर पोलिसांनी 3,787 मानवी हाडे जप्त केली आहेत.

आरोपीच्या घरात मानवी हाडे सापडल्याची बातमी आगीसारखी पसरली आहे. येथे उत्खननानंतर पोलिसांनी 3,787 मानवी हाडे जप्त केली आहेत.

नवी दिल्ली 14 जून : एका नरभक्षक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली (Police Arrest Man of Cannibalism) आहे. खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात दहशत पसरली आहे. या आरोपीच्या घरात मानवी हाडे सापडल्याची बातमी आगीसारखी पसरली आहे. येथे उत्खननानंतर पोलिसांनी 3,787 मानवी हाडे जप्त केली आहेत. ही घटना उत्तर अमेरिकेतील मॅक्सिकोमधील (Mexico) आहे. हे प्रकरण नोएडाच्या निठारी घटनेची आठवण करुन देणारं आहे.

द सनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या आरोपीचं नाव एन्ड्रेस असं असून तो कसाई आहे. पोलिसांनी सांगितलं, की हा आरोपी पापणी लवायच्या आधीच लोकांना आपलं शिकार बनवत असे. या सिरीयल किलरच्या घरी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमनं 20 बेपत्ता लोकांच्या अवशेषांचा तपास लावत हजारो हाडे जप्त केली असल्याचा दावा केला आहे. एन्ड्रेसच्या घरातील फर्शीच्या खालून ही हाडं ताब्यात घेण्यात आली आहेत. फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी सांगितलं, की चौकशीदरम्यान असं समोर आलं, की या सर्व मृतदेहांना अत्यंत लहान तुकड्यांमध्ये कापलं गेलं होतं.

GF सोबत निकाह करण्यासाठी लपवला धर्म; पॅन कार्डवरील नाव पाहून मांडवात तुफान राडा

पोलीस आता त्या अपार्टमेंटमधील आणखी काही रुममध्ये खोदकाम करण्याच्या तयारीत आहेत. आरोपीच्या घरामध्ये अनेक वर्षांपूर्वी गायब झालेल्या लोकांचे ओळखपत्र, कपडे आणि सामान आढळून आलं आहे. यामुळे हे स्पष्ट झालं आहे, की आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून हा गुन्हा करत आहे. आरोपी पकडला गेला कारण त्यानं एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीलाही आपलं शिकार बनवलं जिला तो आधीपासूनच ओळखत होता. रिपोर्टनुसार,अधिकाऱ्याची पत्नी आरोपीसोबत शॉपिंग ट्रीपवर गेली होती आणि त्याच दिवसापासून ती गायब होती. ती घरी न परतल्यानं पोलीस अधिकाऱ्याला आरोपीवर संशय आला.

पैसों के लिए कुछ भी! तलावात दिसल्या 500 च्या नोटा, त्याचं झालं असं की...

स्थानिक पोलिसांनी नरभक्षी आरोपीच्या गुन्ह्यांची माहिती देत न्यायालयात पुरावेही सादर केले. न्यायालयात हेदेखील सांगण्यात आलं, की आरोपीनं पीडितेला केवळ यासाठी मारलं कारण त्याला ती आवडायची. 4 तास सुरू असलेल्या या सुनावणीत आरोपीनं स्वतःला आजार असल्याचा दावा केला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder