राजस्थान, 14 जून: राजस्थानच्या (Rajasthan) अजमेरमध्ये गजब अशी घटना घडली आहे. पैशांसाठी लोकांनी तलावात उड्या घेतल्याचं समजतंय. त्याच नेमकं झालं असं की अजमेर जिल्ह्यातल्या आनासागर (Anasagar Lake) तलावात कोणीतरी नोटांनी भरलेली बॅग फेकली. त्यानंतर तलावात 200-500 रुपयांच्या नोटा तरंगू लागल्या. जशी ही खबर गावकऱ्यांना मिळाली. तशी सर्वांनी तलावाकडे धाव घेतली. त्यानंतर कशाचाही विचार न करता काहींनी तलावात उड्या मारल्या आणि नोटा शोधण्यास सुरुवात केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांना काठीचा धाक दाखवून पळवून लावलं. तलावात नोटांनी भरलेली बॅग कोणी आणि का फेकली याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
नेमकी घटना घडली कशी?
ही घटना आनासागर तलावाच्या रामप्रसाद घाटावर घडली. रविवारी या तलावात अज्ञातानं पैशांनी भरलेली बॅग फेकली. बॅगेतील नोटा पाण्यात पसरल्या आणि तरंगू लागल्या. त्यानंतर शहरात अफवा पसरली की तलावात नोटांचा पाऊस झाला. ही बातमी कानावर पडताच सर्वांनी तलावाकडे धाव घेतली. कशाचाही विचार न करता काहींनी तलावात उडी घेतली. त्यानंतर काहींना 500 तर काहींच्या हाती 200 रुपयांच्या नोटा लागल्या. लोकांना नोटा लुटताना बघितल्यावर तलावाच्या सुरक्षा रक्षकांनीही तलावात उडी मारली. एवढंच काय तर महापालिकेच्या कर्मचार्यांनीही बोट घेऊन नोटा लुटण्यास सुरुवात केली.
हेही वाचा- काय सांगता! 'या' देशात राहते पावसाची राणी
थोड्याच वेळात घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी तलावात उड्या घेतलेल्यांना काठीचा धाक दाखवून तिथून पळवून लावलं. दरम्यान ही पैशांनी भरलेली बॅग कोणी आणि का फेकली याचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.