मराठी बातम्या /बातम्या /देश /प्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी लपवला धर्म; पॅन कार्डवरील नाव पाहताच मांडवात तुफान राडा

प्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी लपवला धर्म; पॅन कार्डवरील नाव पाहताच मांडवात तुफान राडा

मौलवी निकाह लावत असताना नवरदेवाला उर्दू उच्चार व्यवस्थित करता न आल्यानं एक धक्कादायक सत्य (Marriage fraud) बाहेर आलं आहे. यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी भर मंडपात नवरदेवाची चांगलीच धुलाई केली आहे.

मौलवी निकाह लावत असताना नवरदेवाला उर्दू उच्चार व्यवस्थित करता न आल्यानं एक धक्कादायक सत्य (Marriage fraud) बाहेर आलं आहे. यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी भर मंडपात नवरदेवाची चांगलीच धुलाई केली आहे.

मौलवी निकाह लावत असताना नवरदेवाला उर्दू उच्चार व्यवस्थित करता न आल्यानं एक धक्कादायक सत्य (Marriage fraud) बाहेर आलं आहे. यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी भर मंडपात नवरदेवाची चांगलीच धुलाई केली आहे.

महाराजगंज, 14 जून: मौलवी निकाह लावत असताना नवरदेवाला उर्दू उच्चार व्यवस्थित करता न आल्यानं एक धक्कादायक सत्य (Marriage fraud) बाहेर आलं आहे. मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्यानं त्यांनी नवरदेवाची चौकशी केली. यावेळी नवरदेव तरुणाचं पितळ उघडं पडलं आहे. पॅनकार्डवरील नाव (Name on PAN card) पाहिल्यानंतर मांडवात तुफान राडा झाला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी संबंधित नवरदेवाची चांगलीच धुलाई (Relative beat groom) केली आहे. यानंतर हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील आहे आहे. येथील सिद्धार्थनगर परिसरात राहणाऱ्या एका युवकाला कोल्हुई परिसरात राहणाऱ्या एका मुस्लीम तरुणीवर प्रेम झालं होतं. सोशल मीडियातून ओळख झाल्यानंतर त्यांच्यात वारंवार संवाद होऊ लागला. मुलगा अनेकदा मुलीच्या घरीही येत होता. मुलीच्या कुटुंबीयांशी त्याची चांगली ओळख झाली. मुलीच्या घरच्यांनाही मुलगा आवडला. कुटुंबीय लग्नाला नकार देतील म्हणून तरुणाने मागील दोन वर्षांपासून अनेक गोष्टी मुलीपासून लपवल्या होत्या.

दरम्यान कुटुंबीयांच्या सहमतीनं निकाहाची तारीख ठरली. लॉकडाऊन सुरू असल्यानं आपले आई वडील निकाहाला येऊ शकणार नाहीत, असा बहाणा आरोपी तरुणानं केला. तसेच माझे काही जवळचे मित्र लग्नाला येतील, असं आरोपीनं मुलीच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. मुलीच्या नातेवाईकांनीही आरोपीवर विश्वास ठेवला. यावेळी मौलवी निकाह लावत असताना आरोपी तरुणाला उर्दू शब्द उच्चरायला अडचणी येऊ लागल्या.

हे ही वाचा- बापरे! एकाच नवरीसाठी मंडपात पोहोचल्या सहा वराती, मग कोणाला मिळाली नवरी?

यामुळे मुलीच्या नातेवाईकांना नवरदेवावर संशय आला. यानंतर कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी आरोपी मुलाच्या पॅनकार्डची तपासणी केली. पॅनकार्डवरील तरुणाचं नाव पाहून मुलीच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीनचं सरकली. पितळ उघडं पडल्यानंतर मुलाकडून आलेले अनेकजण पळ काढण्याच्या बेतात होते. तेव्हा मुलीच्या घरच्यांनी नवऱ्या मुलाला आणि त्याच्यासोबत आलेल्या मित्रांना मारहाण करायला सुरुवात केली. कुटुंबीयांनी नवऱ्या मुलाची चांगलीचं धुलाई केली आहे. यानंतर आरोपी मुलाला आणि त्याच्या काही मित्रांना कुटुंबीयांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Marriage, Uttar pradesh