मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भरधाव दुचाकी महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली, नालासोपाऱ्यातील घटनेचा VIDEO

भरधाव दुचाकी महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली, नालासोपाऱ्यातील घटनेचा VIDEO

वाहतूक महिला पोलिसाच्या अंगावर भरधाव वेगात दुचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी नालासोपाऱ्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

प्रतिनिधी विजय देसाई, नालासोपारा 28 सप्टेंबर : वाहतूक महिला पोलिसाच्या अंगावर भरधाव वेगात दुचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी नालासोपाऱ्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेत महिला पोलिसाच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. नालासोपारा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी वकील दाम्प्त्याला अटक करण्यात आली आहे.

BREAKING : बच्चू कडूंना राग अनावर, पोलिसांमोरच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली, VIDEO

तर पोलिसांनी मुद्दाम आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचं वकिलाचं म्हणणं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक महिला पोलीस प्रज्ञा दळवी (वय ३०) या सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाटणकर पार्क येथील गोडाऊनवर असताना हा प्रकार घडला आहे. वकील ब्रजेशकुमार भेलौरिया (३१) यांची दुचाकी वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गोडाऊनमध्ये आणली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी सरकारी जागेत जबरदस्तीने घुसून सरकारी कामात अडथळा निर्माण करू लागला. यानंतर आरोपीने दुचाकी बाहेर काढून भरधाव वेगाने गोडाऊनच्या मेन गेटवर नेत जोराने आदळली.

महिला पोलीस प्रज्ञा यांनी आरोपीला थांबविण्यासाठी प्रयत्न केल्यावर आरोपीने त्यांच्या अंगावर दुचाकी चढवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाली आहे. आरोपीने शिवीगाळ करून मी वकील असून तुमची नोकरी खाऊन टाकेन, तुम्ही रिश्वतखोर असून तुम्हाला आता बघून घेतो अशी धमकी दिली.

नजर हटी..., नियंत्रण सुटले अन् सुसाट कार 4 वेळा पलटली, अपघाताचा LIVE VIDEO

महिला पोलिसाने आरोपी वकील ब्रजेशकुमार भेलौरिया (३१) आणि त्यांची पत्नी डॉली भेलौरिया (३१) यांच्याविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा व महिला पोलिसांवर भरधाव वेगात दुचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी वकील दाम्प्त्याला अटक करण्यात आली असल्याचे विलास सुपे यांनी सांगितलं.

First published:

Tags: Accident, Shocking video viral