अमरावती, 28 सप्टेंबर : शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र असते. आज अमरावतीमध्ये कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या बच्चू कडू यांना राग अनावर झाला आणि पोलिसांसमोरच त्यांनी कार्यकर्त्याच्या कानाशिलात लगावली. प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू आणि अधिकाऱ्यांचा वाद सर्वश्रुत आहे. मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत वाद घातल्यामुळे अनेक वेळा बच्चू कडू हे अडचणीत सापडले आहे. पण, आता बच्चू कडू यांनी आपल्याच कार्यकर्त्यावर हात उगारला असल्याचे समोर आले आहे. अमरावतीच्या गणोजा गावात बच्चू कडू उद्घाटनासाठी गेले होते. रस्त्याच्या कामकाजासंदर्भात कार्यकर्त्यांनी त्यांना पाहण्यासाठी बोलावले होते. यावेळी वादविवाद झाला.
बच्चू कडू यांना राग अनावर, कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली pic.twitter.com/n11FtwbWg4
— News18Lokmat (@News18lokmat) September 28, 2022
इतक्यातच त्यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे बच्चू कडू पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याला कानाखाली मारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांचा अवतार पाहून कार्यकर्तेही अवाक् झाले. पण, आपल्या हातातून घडलेल्या प्रकारानंतर बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याची समजूत काढली आणि खांद्यावर हात ठेवून सोबत घेऊन गेले. दरम्यान, बच्चू कडूंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (…तेव्हा उद्धव ठाकरेंकडून ‘ती’ चूक झाली, एकनाथ खडसेंनी सांगितले कारण) दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अधिकाऱ्याशी वाद घातलण्याप्रकरणी गिरगांव कोर्टाने बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्याच दिवशी त्यांना जामीनही मिळाला. सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. या प्रकरणी आज बच्चू कडू गिरगांव कोर्टात हजर झाले होते. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी हायकोर्टात धाव घेऊन जामीन मिळवला.