राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 28 सप्टेंबर : बुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कारला अपघात झाला. कार महामार्गावरच 3 ते 4 वेळा पलट्या घेतल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर हा अपघात घडला आहे. शेगाववरून एक 4 चाकी भरधाव कार खामगावच्या दिशेने जात होती. अचानक महामार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यावरच पलटी झाली. कारने 3 ते 4 पलट्या घेतल्या आणि त्यानंतरच थांबली.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव-शेगाव रोडवर कारचा अपघात pic.twitter.com/Tg85yZXQ40
— News18Lokmat (@News18lokmat) September 28, 2022
रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमधील लोकांनी तातडीने कारकडे धाव घेऊन चालकाच्या मदतीला धावले.जखमी झालेल्या चालकाला तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सुदैवाने कारमध्ये कार चालकाशिवाय कुणी नसल्याने मोठा अपघात टळला. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अपघातानंतर कार चालकाला बाहेर काढून उपचारार्थ दाखल केले आहे. पीकअप व्हॅनला भीषण अपघात, 1 ठार दरम्यान, मजूर घेऊन जाणाऱ्या एका पीक अपव्हॅनचा यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील नायगाव जवळ अपघात झाला. यात एक जण ठार, तर 21 जन जखमी झाले. ही घटना सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली. ( एक्सपायर झालेल्या कॉस्मेटिक प्रॉडक्टची करायचे विक्री, मुंबईत गुन्हे शाखेची… ) बुलढाणा येथील पीक व्हॅन मजूर घेऊन चंद्रपूरकडे जात होती. याच दरम्यान नायगाव येथे 3 जण नदी पुलावर उभे असताना व्हॅनने या तिघांना धडक दिली. यात एक जण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी आले. तिघांना धडक दिल्यानंतर व्हॅन नदीत जाऊन कोसळली. या व्हॅनमध्ये 33 मजूर होते. त्यापैकी 18 जण जखमी झाले. गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे.