मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पती-पत्नीमधील भांडणाचा रक्तरंजित शेवट; तरुणाने अख्खं कुटुंबच संपवलं!

पती-पत्नीमधील भांडणाचा रक्तरंजित शेवट; तरुणाने अख्खं कुटुंबच संपवलं!

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

तसं पाहता पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत असतं. मात्र या तरुणाने अमानवीय कृत्य केलं.

  • Published by:  Meenal Gangurde

जयपूर, 6 जून : उदयपुरमधील (udaipur) कोटडा भागात एका (Rajasthan News) व्यक्तीने धक्कादायक पाऊल उचलत आपली पत्नी आणि मुलींची हत्या केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. (wife murder) या तिघी रात्री गाढ झोपेत होत्या. त्यावेळी आरोपी पतीने तिघींची दगडाने ठेचून हत्या केली. अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिघींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पती तेथून फरार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पती आणि पत्नीमध्ये दररोज भांडण होत होते. ज्यामुळे पतीने हे भयंकर पाऊल उचललं. दुसऱ्या दिवशी सकाळी या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिघांचे मृतदेह शवगृहात ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने तिघींची हत्या केली. यात 25 वर्षी पत्नी, 7 वर्षीय मुलगी आणि 4 वर्षांच्या दुसऱ्या मुलीचा मृत्यू झाला. आरोपी पती घटनास्थळाहून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तसं पाहता पती-पत्नीमधील वाद हे काही नवे नाहीत. प्रत्येक दाम्पत्यामुळे छोटे-मोठे वाद होत असतात. मात्र या आरोपीने या वादातून थेट पत्नीची हत्या केली. त्याने आपल्या मुलींनाही सोडलं नाही आणि त्यांचाही जीव घेतला. या घटना थरकाप उडवणाऱ्या आहेत. भांडणासारख्या छोट्याशा कारणामुळे त्याने तिघींचा जीव घेतला.

First published:

Tags: Crime news, Murder, Rajasthan, Wife and husband