पुणे, 5 जून : शहरात इन्स्टाग्रामवर स्टेटस (Instagram Status) ठेवले म्हणून अल्पवयीन तरुणांमध्ये वाद झाला होता. ही घटना ताजी असतानाचा आता यानंतर मित्राची गर्लफ्रेंड (Relation with Friend Girlfriend) पटवल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील गोळीबार मैदान चौक ते लुल्लानगर चौक या परिसरादरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल (Filed Crime) केला आहे.
काय आहे घटना -
मित्राची गर्लफ्रेंड पटवल्याचा राग मनात धरत कोयत्याने वार (Attack) केल्याची घटना पुण्यात घडली. शहरातील गोळीबार मैदान चौक ते लुल्लानगर चौक या परिसरादरम्यान शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी नदीम सय्यद यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanawadi Police Station) तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी इरफान इम्तियाज खान (वय 25), मोसीन सलीम शेख (वय 24, रा. मनीष पार्क, कौसरबाग, कोंढवा) यांच्यासह आणखी एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र साहिल गुलाम शेख हे दुचाकीवरून पहाटे चहा पिण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना लुल्लानगर चौकात गाठले. साहिल शेख याने इरफान खान याच्या गर्लफ्रेंडला पटविले, असे आरोपींचे म्हणणे आहे. त्याचाच राग त्यांच्या मनात होता. यावरून त्यांनी चाकू आणि कोयत्याने साहिलवर सपासप वार केले.
Satara : लग्नाचं आमिष देऊन ठेवले वारंवार शारीरिक संबंध, पीडिता गर्भवती झाल्यावर केलं धक्कादायक कृत्य
या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना दिलेल्या तक्रारी नंतर तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यातील मोसीन शेख याला अटकही केली आहे. याप्रकरणी, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.