पाटणा 05 जून : एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक करण्यासाठी विचित्र कट रचला. तिने आधी तिच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून स्वतःचा अश्लील व्हिडिओ बनवला. त्यानंतर पतीला सांगितलं की ती एका सायबर गुन्हेगाराच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आणि त्याने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला आहे. आता तो दीड लाख रुपये मागत आहे. पत्नीच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून तिला त्रासातून मुक्त करण्यासाठी आपण दीड लाख रुपये दिल्याचा पतीचा दावा आहे. मात्र आता या व्हिडिओचं कारण सांगत पत्नी पुन्हा पैशांची मागणी करत असल्याचं पतीनं म्हटलं. जेव्हा पतीने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा पत्नीने स्वतःचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला (Wife Blackmailing Husband). पुणे हादरलं! भल्या पहाटे तरुणासोबत रस्त्यात धक्कादायक कृत्य, मित्राची गर्लफ्रेंड पटवल्याचा राग आता पती सोशल मीडियावर आपली व्यथा मांडत आहे. हे प्रकरण मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पतीने दावा केला आहे की पत्नीने तिच्या प्रियकराकडून स्वतःचा अश्लील व्हिडिओ बनवून घेतला आणि सायबर फसवणूक करणाऱ्याच्या जाळ्यात अडकल्याचं सांगून पतीकडून दीड लाख रुपये उकळले. नवऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीने सांगितलं की ‘व्हिडिओ कॉलदरम्यान त्याने एक अश्लील व्हिडिओ बनवला होता. माझी चूक माफ कर. सायबर एक्सपर्टला दीड लाख रुपये दिल्यास तो व्हिडिओ डिलीट करेल.’ आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पतीने दीड लाख रुपये दिले. मात्र पत्नीने पुन्हा ५० हजारांची मागणी केली. पतीने हे पैसे देण्यास नकार दिला. यानंतर पत्नीने पतीला धमकी दिली आणि सांगितलं की ‘हा व्हिडिओ मीच माझ्या प्रियकराकडून बनवून घेतला आहे. खरं तर, तो सायबर एक्सपर्ट नसून माझा प्रियकर आहे. अजून पैसे दे, नाहीतर मी माझा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन.’ यानंतर पती नाराज झाला आणि सोशल मीडियावर मदतीची मागणी करत आहे Beed Crime: मध्यरात्री घरात शिरले अन् पतीला बांधून पत्नीचा खून केल्याचा दावा, तपासात बिंग फुटलं आणि… पती दीपकच्या म्हणण्यानुसार, त्याचं लग्न 2019 मध्ये मुस्कान नावाच्या मुलीशी झालं होतं. दोघांना एक अडीच वर्षांचा मुलगा असून त्याचं नाव हंसराज आहे. दीपक पाटण्यात गवंडी म्हणून काम करतो. दीपकने पोलिसांना लिहिलेल्या अर्जात संपूर्ण घटनाक्रम कथन केला असून, अशा पत्नीपासून आपली सुटका करून आपला अडीच वर्षांचा मुलगा परत आणावा, अशी विनंती केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.