मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /कोरियातून दिली 7 लाखांची सुपारी, चारित्र्याच्या संशयावरून केला चुलतीचा खून

कोरियातून दिली 7 लाखांची सुपारी, चारित्र्याच्या संशयावरून केला चुलतीचा खून

आपल्या काकीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या पुतण्याने सुपारी देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आपल्या काकीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या पुतण्याने सुपारी देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आपल्या काकीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या पुतण्याने सुपारी देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोरखपूर,16 डिसेंबर: आपल्या चुलतीच्या चारित्र्यावर (Doubt on character) संशय असल्यामुळे परदेशात (Foreign) असलेल्या तिच्या पुतण्याने सुपारी देऊन (Betel) तिचा खून (Murder) केल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे. आपल्या चुलतीच्या वागणुकीमुळे आपल्या खानदानाची इज्जत चव्हाट्यावर येत असल्याचा दावा करत या पुतण्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला आणि काही मित्रांच्या मदतीनं सुपारी देत मारेकऱ्यांकरवी स्वतःच्याच चुलतीचा बळी घेतला. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं आहे.

चुलतीसोबत वाद

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये राहणाऱ्या गोपाळ यादव यांच्या चुलत्याचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर त्याची चुलती पुष्पा यादव ही घराबाहेरील काही लोकांच्या संपर्कात असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना होता. त्यांनी तिला घराबाहेर न पडण्याची ताकीद केली होती. मात्र त्याला न जुमानता ती बाहेर पडत होती. काही दिवसांनंतर तिने घर सोडून वेगळ्याच भागात राहून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे आपली इज्जत धुळीला मिळत असल्याची भावना गोपाळच्या मनात सल करून होती. नोकरीनिमित्त कोरियात असलेला गोपाळ काहीही करून काकीला संपवण्याचा डाव आखत होता. त्यासाठी त्याने सुपारी देऊन तिचा काटा काढण्याचा निर्णय़ घेतला.

हे वाचा-  'साहब, मै मर्डर करके आया', बीडमधील थरारक हत्याकांडात अल्पवयीन मुलाची कबुली

अशी आखली योजना

गोपाळने कोरियातूनच त्याच्या तीन साथीदारांना या हत्येच्या कटात सामील करून घेतलं. उमेश यादव, श्रीकांत यादव आणि विश्वनाथ यादव यांना त्यानं हत्येसाठी 7 लाख रुपये दिले आणि मारेकऱ्यांकरवी पुष्पा यादव यांची हत्या करण्यास सांगितलं. यांनी गोविंद यादवला या कामी नेमलं आणि त्याने रिव्हॉल्व्हरने पुष्पा यांची हत्या केली. पोलिसांनी या चौघांनाही अटक केली आहे. कोरियात असणाऱ्या गोपाळची पोलीस वाट पाहत असून अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime, Murder, North korea, Police