Home /News /maharashtra /

'साहब, मै मर्डर करके आया', बीडमधील थरारक हत्याकांडात अल्पवयीन मुलाची कबुली, कारण समोर

'साहब, मै मर्डर करके आया', बीडमधील थरारक हत्याकांडात अल्पवयीन मुलाची कबुली, कारण समोर

Murder in Beed: मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बीड शहरातील स्काऊट गाईड भवनासमोर एका तरुणाची निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली होती.

    बीड, 16 डिसेंबर: मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बीड (Beed) शहरातील स्काऊट गाईड भवनासमोर एका तरुणाची निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली होती. आरोपींनी मृत तरुणाचा पाठलाग करत भरदिवसा त्याच्यावर चाकूने सपासप वार (Attack with knife) केले होते. या हल्ल्यात तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. हत्येच्या या थरारक घटनेनंतर अल्पवयीन मुलाने बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह अन्य दोघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शेख शाहेद शेख सत्तार असं हत्या झालेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव असून तो बीड शहरातील धांडेगल्ली येथील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलासह मोहनसिंग हिरासिंग शिकलकरी (20) आणि राधाबाई हिरासिंग शिकलकरी (50) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मोहनसिंग आणि राधाबाई या मायलेकांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन आरोपीला बालगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हेही वाचा-सूड भावनेनं माकडांचं भयंकर कृत्य, महिनाभरात 250कुत्र्यांच्या पिल्लांचा घेतला जीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शाहेद याचं आरोपींशी नशेच्या गोळ्या विक्री करण्यावरून वाद झाला होता. घटनेच्या दिवशी शाहेद याचा अल्पवयीन आरोपी आणि मोहनसिंग याच्यासोबत शिवाजी पुतळ्याजवळ बाचाबाची झाली होती. यानंतर शाहेद यानं आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत बसस्थानकाच्या दिशेनं धावत गेला. पण स्काऊट गाईड भवन परिसरातील एका टपरीजवळ आरोपींनी शाहेद याला गाठलं. हेही वाचा- Pune: मित्र पत्नीवर करायचे बलात्कार अन् पतीला व्हायचा आनंद; 3 वर्षे सुरू होता भयावह प्रकार यावेळी आरोपी मोहनसिंग याने आपल्याजवळील चाकूने शाहेद याच्यावर हल्ला केला. पण शाहेदने हा हल्ला चुकवला. यावेळी संतापलेल्या अल्पवयीन आरोपीनं मोहनसिंग याच्या हातातील चाकू घेऊन शाहेद याच्यावर सपासप वार केले. या घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पोबारा केला. यानंतर काही वेळानं अल्पवयीन मुलानं शिवाजी नगर पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली आहे. त्याने पोलीस ठाण्यात जाऊन 'साहब, मै मर्डर करके आया हू' असं पोलिसांना सांगितलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed, Crime news, Murder

    पुढील बातम्या