पुणे 23 नोव्हेंबर : राज्यात गुन्हेगारी च्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातूनही हत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता आणखी एका घटनेनं खळबळ उडाली आहे. यात प्रियकराने एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना चाकणधून उघडकीस आली आहे. प्रियकराची पत्नी ठरत होती नात्यात अडसर, रागात पुण्यातील प्रेयसीने केलं भयानक कांड यातील प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीची केवळ यासाठी हत्या केली, कारण ती जुन्या प्रेमसंबंधाकडे दुर्लक्ष करत आहे, असं त्याला वाटलं. प्रेयसी आपल्याकडे दुर्लक्ष करत असून आपल्यासोबत बोलत नसल्याच्या रागातून प्रियकराने 28 वर्षीय विवाहित महिलेचा खून केल्याचा प्रकार चाकणमध्ये उघडकीस आला. चाकण औद्योगिक क्षेत्रातील खराबवाडी येथे 28 वर्षीय विवाहित महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. निकिता कांबळे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. जुन्या ओळखीतून जुळलेल्या प्रेमसंबंधाकडे मयत महिला दुर्लक्ष करत असल्याच्या रागातून तिचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. राम सुर्यवंशी असं आरोपीचं नाव असून महिलेच्या खून प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी राम याला अटक केली आहे. दुसऱ्या कुणाशी लग्न केलंस तर….; पिंपरी चिंचवडमध्ये विवाहित प्रेयसीच्या छळाला कंटाळून तरुणाचं टोकाचं पाऊल पुण्यात प्रियकराच्या पत्नीची हत्या - नुकतंच पुण्यातूनही एक धक्कादायक घटना समोर आली होती. ज्यात एका महिलेनं प्रियकराच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली. हत्येची ही घटना राजगुरुनगरमधून समोर आली. राहत्या घरात कोमळ थिंगळे-केदारी या विवाहित महिलेचा खून झाला होता. हत्येनंतर ही आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्नही केला गेला. मात्र, अखेर या घटनेचा पर्दाफाश झाला. विवाहित प्रियकरासोबतच्या नात्यात अडथळा ठरत असलेल्या प्रियकराच्या पत्नीचा महिलेनं गळा दाबून जीव घेतला असल्याचं समोर आलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.