जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रियकराची पत्नी ठरत होती नात्यात अडसर, रागात पुण्यातील प्रेयसीने केलं भयानक कांड

प्रियकराची पत्नी ठरत होती नात्यात अडसर, रागात पुण्यातील प्रेयसीने केलं भयानक कांड

प्रियकराची पत्नी ठरत होती नात्यात अडसर, रागात पुण्यातील प्रेयसीने केलं भयानक कांड

विवाहित प्रियकरासोबतच्या नात्यात अडथळा ठरत असलेल्या प्रियकराच्या पत्नीचा महिलेनं गळा दाबून जीव घेतला असल्याचं समोर आलं आहे. राजगुरुनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा बनाव फसला.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे 21 नोव्हेंबर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक घटना इतक्या भयानक असतात की त्याबद्दल ऐकूनही थरकाप उडतो. आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात एका महिलेनं प्रियकराच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. दुसऱ्या कुणाशी लग्न केलंस तर….; पिंपरी चिंचवडमध्ये विवाहित प्रेयसीच्या छळाला कंटाळून तरुणाचं टोकाचं पाऊल हत्येची ही घटना राजगुरुनगरमधून समोर आली आहे. हत्येची ही घटना चार दिवसांपूर्वीची आहे. चार दिवसांपूर्वी राहत्या घरात कोमळ थिंगळे-केदारी या विवाहित महिलेचा खून झाला होता. हत्येनंतर ही आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्नही केला गेला. मात्र, अखेर या घटनेचा पर्दाफाश झाला. विवाहित प्रियकरासोबतच्या नात्यात अडथळा ठरत असलेल्या प्रियकराच्या पत्नीचा महिलेनं गळा दाबून जीव घेतला असल्याचं समोर आलं आहे. राजगुरुनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा बनाव फसला. अखेर या प्रकरणी प्रियकराच्या पत्नीचा खून करणा-या प्रेयसीला राजगुरुनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वाती रेंगडे असं आरोपी प्रेयसीचं नाव आहे. प्रेयसीवर एवढं प्रेम की थेट घेतला जीव अन् म्हणाला…‘सॉरी बाबू स्वर्गात भेटू…’ प्रेयसीने पतीच्या मदतीने केले प्रियकराचे 6 तुकडे - नालंदा जिल्ह्यातूनही एक धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेत एका महिलेने आपल्या पतीच्या मदतीने आपल्याच प्रियकराची हत्या केली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. विवाहबाह्य संबंधामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. नालंदा जिल्ह्यातील सिलाव पोलीस स्टेशन हद्दीतील नांद गावात राहणारा विकास चौधरी बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाला होता. त्याच्या विवाहित प्रेयसी आणि तिच्या पतीने विकासची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले. गुरुवारी रात्री दीपनगरमधील मेघी गावाजवळ विकास चौधरीचा कापलेला हात आणि पाय सापडला. यानंतर मोठी खळबळ उडाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात