जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 35 वर्षीय महिलेनं रात्रभर 19 वर्षीय प्रियकरासोबत पार्टी केली; पहाटे घराबाहेर दिसलं भयानक दृश्य

35 वर्षीय महिलेनं रात्रभर 19 वर्षीय प्रियकरासोबत पार्टी केली; पहाटे घराबाहेर दिसलं भयानक दृश्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका 19 वर्षीय तरुणाने 35 वर्षीय प्रेयसीची हत्या केली. हत्येनंतर त्याला मृतदेह शेजाऱ्याच्या अंगणात लपवायचा होता, मात्र गावकऱ्यांनी त्याला पाहिल्यावर तो मृतदेह तसाच सोडून घटनास्थळावरून पळून गेला (Crime News)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

रायपूर 15 सप्टेंबर : हत्येचं एक अतिशय धक्कादायक प्रकरण छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील पासन पोलीस स्टेशन परिसरातून समोर आलं आहे. दमदहापारा रामपूर गावात एका 19 वर्षीय तरुणाने 35 वर्षीय प्रेयसीची हत्या केली. हत्येनंतर त्याला मृतदेह शेजाऱ्याच्या अंगणात लपवायचा होता, मात्र गावकऱ्यांनी त्याला पाहिल्यावर तो मृतदेह तसाच सोडून घटनास्थळावरून पळून गेला. घटनेनंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, मृत महिलेचा पती काही कामानिमित्त दुसऱ्या गावी गेला होता. याचा फायदा घेत मयत महिलेनं तिच्या 19 वर्षीय प्रियकर समारुला घरी बोलावलं. मृत महिलेला तीन मुलं होती, त्यांना तिने एका खोलीत झोपवलं आणि बाहेरून कुलूप लावलं. पतीच्या घर बांधण्याच्या हौसेनं घेतला विवाहितेचा जीव; बीडमधील धक्कादायक घटना मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही रात्रभर दारू आणि चिकन पार्टी करत मस्ती करत होते. पहाटे तीन वाजता प्रियकर तरुणाला घरी जायचं होतं, मात्र प्रेयसीने त्याला अडवलं. पाच वाजेपर्यंत प्रेयसी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती. यावरून वाद झाला, त्यानंतर समारूने घरात ठेवलेल्या फावड्याने महिलेचा खून केला. यानंतर प्रेयसीचं नग्न प्रेत शेजाऱ्याच्या घरात लपवण्याचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांनी त्याला पाहिलं. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. मृत महिलेच्या पतीने आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पळस पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवकुमार धारी यांनी सांगितलं की, आरोपी समारू देव याचे मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, तो रात्री 11 वाजता प्रेयसीला तिच्या घरी भेटण्यासाठी गेला होता. रात्री झालेल्या वादाच्या रागात त्याने प्रेयसीची हत्या केली. 45 दिवसांपासून तिचं शव होतं मीठात, बापाच्या संघर्षाची अखेर प्रशानकाडून दखल, मुंबईत होणार शवविच्छेदन प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी काही वेळ मृतदेहाजवळ बसून होता. मग मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल त्याने विचार केला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींने मृतदेह शेजाऱ्याच्या अंगणात ठेवण्याचा कट रचला. त्याने महिलेचा विवस्त्र मृतदेह घरातून ओढत नेला, मात्र यावेळी लोकांच्या नजरा त्याच्यावर पडल्या. लोकांनी आरडाओरडा केल्यावर आरोपी तिथून पळून गेला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात