मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पतीच्या घर बांधण्याच्या हौसेनं घेतला विवाहितेचा जीव; बीडमधील धक्कादायक घटना

पतीच्या घर बांधण्याच्या हौसेनं घेतला विवाहितेचा जीव; बीडमधील धक्कादायक घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ढाकेफळ येथील मयत शिल्पा योगीराज घाडगे हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी योगीराज शिवाजी घाडगे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्या दोघांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्य झाली (Woman Commits Suicide)

बीड 15 सप्टेंबर : घर बांधण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन का येत नाहीस? असं म्हणत सासरच्या लोकांकडून विवाहितेचा सतत छळ सुरू होता. याा छळाला कंटाळून एका 26 वर्षीय विवाहित महिलेनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या ढाकेफळ येथे घडली. या प्रकरणी तिच्या पतीसह चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 45 दिवसांपासून तिचं शव होतं मीठात, बापाच्या संघर्षाची अखेर प्रशानकाडून दखल, मुंबईत होणार शवविच्छेदन केज तालुक्यातील ढाकेफळ येथील मयत शिल्पा योगीराज घाडगे हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी योगीराज शिवाजी घाडगे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्या दोघांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्य झाली. यानंतर घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, असा तगादा पती योगीराज घाडगे, सासू लक्ष्मीबाई घाडगे, दीर बाळासाहेब घाडगे आणि माया घाडगे यांनी शिल्पाकडे लावला. शिल्पाने तिच्या आई-वडीलांकडून एवढी मोठी रक्कम आणण्यास नकार दिला. मात्र, यानंतर पतीसह सासरकडच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. यानंतर शिल्पाला सतत शिवीगाळ आणि मारहाण करीत तिचा मानसिक तसंच शारीरिक छळ केला गेला. सासरच्या लोकांकडून सातत्याने होत असलेल्या छळाला कंटाळून शिल्पा घाडगे हिने 9 वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन केलं. घरात सलग दुसऱ्यांदा मुलीचा जन्म झाल्याने आजोबा नाराज, दारू पिऊन घेतला टोकाचा निर्णय यानंतर शिल्पाला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच शिल्पा योगराज घाडगे हिचा मृत्यू झाला. बीडमधून हुंड्यांसाठी महिलेचा बळी गेल्याची आणखी एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
First published:

Tags: Crime, Suicide

पुढील बातम्या