जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्याजवळ साऊथ फिल्मचा थरार; टोळक्यानं काठ्या, तलवारीनं वार करत दोघांना दगडानं ठेचलं

पुण्याजवळ साऊथ फिल्मचा थरार; टोळक्यानं काठ्या, तलवारीनं वार करत दोघांना दगडानं ठेचलं

पुण्याजवळ साऊथ फिल्मचा थरार; टोळक्यानं काठ्या, तलवारीनं वार करत दोघांना दगडानं ठेचलं

Murder in Pune:पुणे जिल्ह्यातील पाटस याठिकाणी दोन मित्रांना एका टोळक्यानं काठ्या आणि तलवारीनं मारहाण करत त्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटस, 05 जुलै: पुणे (Pune) जिल्ह्यातील पाटस याठिकाणी दोन मित्रांना एका टोळक्यानं काठ्या आणि तलवारीनं मारहाण (Beating) करत त्यांची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी दोन वेगवेगळ्या चारचाकी गाडीतून पळ काढला आहे. पूर्ववैमनस्यातून या दोघांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींची ओळख पटवली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. शिवम संतोष शितकल (वय -23) आणि  गणेश रमेश माकर (वय- 23) असं हत्या झालेल्या दोघा तरुणांची नावं आहेत. पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही तरुण रविवारी रात्री दहाच्या सुमारास पाटस हद्दीतील तामखडा येथील भानोबा मंदिर परिसरात आरोपींकडे गेले होते. दरम्यान त्याठिकाणी असलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर काठी आणि तलवारीनं हल्ला चढवला. मृत तरुणांना काही कळायच्या आत हा हल्ला झाल्यानं त्यांना घटनास्थळावरून पळही काढता आला नाही. यातच दोघंही खाली पडले. आरोपी तरुण त्यांना मारतच राहिले. हेही वाचा- ही दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात, पुण्यातल्या गुंडगिरीचा LIVE VIDEO दरम्यान मुख्य आरोपी मन्या उर्फ महेश संजय भागवत यानं एक मोठा दगड उचलून शिवम संतोष शितकल या तरुणाच्या डोक्यात घातला. तर महेश टुले यानंही दुसरा एक दगड उचलून गणेश माकर याच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मन्या उर्फ महेश संजय भागवत, महेश टुले आणि युवराज शिंदे यांच्यासह अन्य 4 ते 5 अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. हेही वाचा- आधी दुचाकीला बांधून 400मीटर फरफटलं मग झाडाला बांधून..; तरुणाचा फिल्मी स्टाइल खून नेमकं प्रकरण काय आहे? रविवारी रात्री दहाच्या सुमारास पाटस गावच्या हद्दीतील तामखडा येथील भानोबा मंदिराच्या परिसरातून मन्या उर्फ महेश संजय भागवत यानं शिवम संतोष शितकल याला फोन केला.  विनाकारण आई बहिणीवरून शिव्या देतो काय? मी कोण आहे आणि काय करू शकतो? हे तुला दाखवतो, अशी धमकी दिली. त्यामुळे शिवम शितकल आपला मित्र गणेश रमेश माकर याला घेऊन तावातावानं तामखडा याठिकाणी गेला. पण आधीपासून हत्येच्या तयारीत असलेल्या टोळक्यानं दोघांची निर्घृण हत्या केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात