चंद्रपूर, 05 जुलै: लग्नाची पत्नी सोबत असताना प्रेयसीलाही त्याच घरात वर्षभरापासून सोबत ठेवल्याची घटना समोर आली आहे. दरम्यानच्या काळात पत्नी आणि प्रेयसीमध्ये सतत खटके उडत होते. त्यामुळे सततच्या भांडणाला कंटाळून पतीनं आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणानं पत्नीची हत्या केल्यानंतर, अपघाताचा बनाव रचला होता. पण पोलिसांनी चक्र फिरवून काही तासांत आरोपी पतीच्या आणि त्याच्या दोन साथीदाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
गंगाधर सीताराम कन्नाके (वय-28) असं आरोपी पतीचं नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी त्याचं मृत महिलेशी लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस सुखात गेल्यानंतर आरोपी पतीचं एका अन्य तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. यानंतर त्यानं कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेयसीलाही आपल्याच घरात ठेवून घेतलं. मागील एक वर्षापासून आरोपी पती आपल्या प्रेयसीला आणि पत्नीला एकाच घरात ठेवत होता.
हेही वाचा-टिकटॉक स्टारची प्रेयसीला चालत्या दुचाकीवर मारहाण;इन्स्टाग्रामवर VIDEO केला अपलोड
यामुळे दोघींमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणातून खटके उडत होते. त्यांच्या रोजच्या भांडणाला कंटाळून आरोपी गंगाधर यानं आपल्या दोन मित्रांच्या मदतीनं पत्नीच्या हत्येचा कट रचला. यानंतर आरोपीनं त्याचा साथीदार राजकुमार बाबूराव कन्नाके (वय-22) आणि शंकर रामल्लू गंधमवार अशा दोघांची मदत घेत पत्नीचा काटा काढला. यानंतर पतीनं स्वतः कोठारी पोलीस ठाण्यात जाऊन अपघाताची तक्रार दाखल केली.
हेही वाचा-पतीला सोडून सासऱ्यासोबत थाटला तरुणीने संसार, RTI टाकल्यानंतर सिक्रेट झालं उघड
पण पतीचा हा बनाव संशयास्पद असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत हत्येचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पतीसह त्याच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.