मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /खळबळजनक! विडी दिली नाही म्हणून बापलेकाने मिळून केली हत्या, आरोपी फरार

खळबळजनक! विडी दिली नाही म्हणून बापलेकाने मिळून केली हत्या, आरोपी फरार

विडी देण्यास नकार दिला म्हणून धक्कादायक घटना घडली आहे. असा आरोप केला जात आहे की या क्षुल्लक कारणावरून एका बापबेट्याने एका तरुणाची हत्या केली आहे.

विडी देण्यास नकार दिला म्हणून धक्कादायक घटना घडली आहे. असा आरोप केला जात आहे की या क्षुल्लक कारणावरून एका बापबेट्याने एका तरुणाची हत्या केली आहे.

विडी देण्यास नकार दिला म्हणून धक्कादायक घटना घडली आहे. असा आरोप केला जात आहे की या क्षुल्लक कारणावरून एका बापबेट्याने एका तरुणाची हत्या केली आहे.

श्योपूर, 11 नोव्हेंबर: क्षुल्लक कारणावरून बापलेकाने मिळून एका तरुणाची हत्या केल्याची घटना समोर येत आहे. विडी देण्यास नकार दिला म्हणून ही घटना घडली आहे.असा आरोप केला जात आहे की, एका पिता-पुत्राने मिळून एका तरुणाला लोखंडी सळीने मारहाण करून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच गसवानी ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. यानंतर आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

मध्य प्रदेश (Madhya Pradesh)मधील श्योपूर जवळ ही घटना घडली. हे प्रकरण गसवानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बरोडा कला गावातील आहे. गेल्या मंगळवारी बरोडा कला गावातील रहिवासी फालोदी आदिवासीने दारूच्या नशेत कदमू आदिवासी याच्याकडे पिण्यासाठी विडी मागितली. मात्र त्याने विडी देण्यास नकार दिला. एवढ्याच कारणावरून ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. असा आरोप केला जात आहे की, आरोपी फालोदी आणि त्याचा मुलगा बंटी याने मिळून कदमूची लोखंडाच्या सळीने मारुन मारुन हत्या केली. त्या परिसरात आरोपींच्या घराशेजारी राहणाऱ्यांची देखील चौकशी केली आहे.

(हे वाचा-किळसवाणे: दफन केलेल्या मृतदेहाचे केस काढून विकणाऱ्यांना अटक)

(हे वाचा-पोलीस इन्स्पेक्टरच्या 15 वर्षांच्या मुलीनेच घातल्या सख्ख्या भावाला गोळ्या)

आरोपी फरार

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी बापलेक या घटनेनंतर फरार आहेत. गसवानी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. गसवानी स्टेशन प्रभारी भरतसिंग गुर्जर यांचे म्हणणे आहे की, विडी न देण्याच्या मुद्यावरून कदमूला मारण्यात आले. आरोपी वडील आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पकडण्यासाठी ते ज्याठिकाणी लपू शकतात असा अंदाज आहे तिथे शोध सुरू आहे. लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल.

First published:

Tags: Crime, Murder