कोरोनाच्या भीतीमुळे दाम्पत्याची आत्महत्या, पोस्‍टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार

कोरोनाच्या भीतीमुळे दाम्पत्याची आत्महत्या, पोस्‍टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. ही संख्या 2566 वर पोहोचली आहे.

  • Share this:

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. ही संख्या 2566 वर पोहोचली आहे. कोरोनाने आतापर्यंत 53 जणांचा बळी घेतला असून 191 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, तरीही संपूर्ण देशात कोरोनाची मोठी दहशत पसरली आहे. अमृतसरमध्ये (Amritsar) शु्क्रवारी कोरोनाच्या (Covid 19) भीतीने एका दाम्पत्याने विष सेवन करुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या दाम्पत्याच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात डॉक्‍टरने स्पष्ट नकार दिला आहे.

हेही वाचा...संचारबंदीत भाजपच्या माजी खासदारांच्या गाडीतून फिरणाऱ्या दोघांवर काठ्यांचा प्रसाद

अमृतसरमधील बाबा बकालातील सठियाला गावात ही घटना घडली आहे. गुरजिंदर आणि बलविंदर कौर असं आत्‍महत्‍या करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. या दाम्पत्याकडे सुसाइड नोटही सापडली आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या भीतीमुळे जीवन संपवत असल्याचं सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात हलवले. मात्र तिथे डॉक्टरने मृतदेहांचे पोस्‍टमार्टम करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मात्र नातेवाईक दोघांचे मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा..लॉकडाउन आणखी वाढणार? एअर इंडियाने घेतलेल्या निर्णयामुळे शंका

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरजिंदर आणि बलविंदर कौर या दाम्पत्याने कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळे आत्‍महत्‍या केली आहे. तला उल्लेख त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये केला आहे. 'कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने मरण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला कोरोना होण्याची भीती आहे.' असे दाम्पत्याने सुसाइ़ड नोटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा..वृद्ध महिलेला मदत करताच तिच्या डोळ्यात आलं पाणी, हरभजन सिंगने शेअर केला VIDEO

दरम्यान, उत्तरप्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात बुधवारी रात एका सरकारी कर्मचारीने कोरोनाच्या धास्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट सापडली होती. त्यात कोरोनाच्या भीतीमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. आदेश सैनी (वय-38) असे मृत व्यक्तीचं नाव आहे.

First published: April 4, 2020, 12:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading