जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / दिल्लीसारखीच आणखी एक घटना! कारची डिलिव्हरी बॉयला धडक; गाडीसोबतच फरफटत नेलं, तरुणाचा मृत्यू

दिल्लीसारखीच आणखी एक घटना! कारची डिलिव्हरी बॉयला धडक; गाडीसोबतच फरफटत नेलं, तरुणाचा मृत्यू

दिल्लीसारखीच आणखी एक घटना! कारची डिलिव्हरी बॉयला धडक; गाडीसोबतच फरफटत नेलं, तरुणाचा मृत्यू

एका अज्ञात कार चालकाने स्वीगीसाठी फूड डिलिवरी करणाऱ्या एका डिलिवरी बॉयला धडक देत 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं. यात डिलिवरी बॉयचा जागीच मृत्यू झाला.

  • -MIN READ Noida,Gautam Buddha Nagar,Uttar Pradesh
  • Last Updated :

नोएडा 05 जानेवारी : दिल्लीतील हिट अॅण्ड रन प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. देशाला हादरवून टाकणारं हे प्रकरण ताजं असतानाच आता नोएडातून काहीसा असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. यात एका अज्ञात कार चालकाने स्वीगीसाठी फूड डिलिवरी करणाऱ्या एका डिलिवरी बॉयला धडक देत 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं. यात डिलिवरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. Road Accidents in India : 3 दिवसात 3 भीषण अपघात, दोघींनी सोडला जीव, तिसरी रुग्णालयात देतेय झुंज; नव्या वर्षाची सुरुवात हादरवणारी! या घटनेनंतर आरोपी कार चालक फरार झाला. पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एडीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितलं की, मृताचा चुलत भाऊ अमितच्या तक्रारीवरून फेज-1 पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, अमित कुमारने 1 जानेवारी रोजी रात्री 1 वाजता भाऊ कौशलला फोन केला. अनोळखी व्यक्तीने फोन उचलला आणि सांगितलं की तुमच्या भावाचा अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाने त्याला सेक्टर 14 फ्लायओव्हरजवळ धडक दिली आणि गाडीसोबत ओढत शनि मंदिराकडील रोडपर्यंत आणलं.

News18लोकमत
News18लोकमत

माहिती मिळताच अमित कुमार शनि मंदिराजवळ पोहोचला. जिथे कौशलचा मृतदेह शनि मंदिराजवळ पडलेला आढळला. घटनास्थळी पोलीसही उपस्थित होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. एफआयआरनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस दिल्ली आणि नोएडाच्या मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. जिथे हा अपघात झाला, तो परिसर नोएडाचा असून इथून काहीच अंतरावर दिल्ली बॉर्डर आहे. जिथे मृतदेह फरफटत आणत टाकला गेला, तिथे शनि मंदिर आहे. तिथे जवळच सीसीटीव्ही लागलेले आहेत. मात्र यातील सीसीटीव्ही फुटेज फार स्पष्ट नाही. भीषण अपघात! पोलीस अधिकाऱ्याने 6 वाहनांना उडवलं; दारूच्या नशेत असल्याचा संशय शनी मंदिराच्या संचालकाने सांगितलं की, पोलीस २ जानेवारीला आले होते. सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, पण धुकं जास्त असल्यानं काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. पोलीस सीसीटीव्ही फुटेज घेऊन गेले होते. कार चालकाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. लवकरच आरोपी कार चालकाला पकडलं जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात