जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / भीषण अपघात! पोलीस अधिकाऱ्याने 6 वाहनांना उडवलं; दारूच्या नशेत असल्याचा संशय

भीषण अपघात! पोलीस अधिकाऱ्याने 6 वाहनांना उडवलं; दारूच्या नशेत असल्याचा संशय

भीषण अपघात! पोलीस अधिकाऱ्याने 6 वाहनांना उडवलं; दारूच्या नशेत असल्याचा संशय

पोलीस अधिकाऱ्याने सहा वाहनांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आली आहे. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा संबंधित पोलीस अधिकारी दारूच्या नशेत होता असा आरोप करण्यात येत आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली : दिल्लीच्या द्वारका रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिल्लीच्या द्वारका रोडवर सहा गाड्यांना उडवलं. हा पोलीस अधिकारी दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला जात आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्हा दाखल पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार एका दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात या अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संबंधित पोलीस अधिकारी हा जेव्हा अपघात झाला तेव्हा आपल्या खासगी कारने प्रवास करत होता. याचवेळी त्याने सहा वाहनांना उडवलं या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हेही वाचा :   Dhananjay Munde accident : धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात …तर कडक कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये संबंधित अधिकाऱ्यासोबतच अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, याबाबत त्यांच्या कुटुंबांना माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जर संबंधित अधिकाऱ्याने आपघातावेळी दारू पिल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरोधाक कडक कारवाई करण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात