मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Road Accidents in India : 3 दिवसात 3 भीषण अपघात, दोघींनी सोडला जीव, तिसरी रुग्णालयात देतेय झुंज; नव्या वर्षाची सुरुवात हादरवणारी!

Road Accidents in India : 3 दिवसात 3 भीषण अपघात, दोघींनी सोडला जीव, तिसरी रुग्णालयात देतेय झुंज; नव्या वर्षाची सुरुवात हादरवणारी!

देशात विविध अपघाताच्या घटनांमधील तीन मुलींचा अपघाती मृत्यू झाला आहे. देशात धक्कादायक अपघातांच्या मालिकेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

देशात विविध अपघाताच्या घटनांमधील तीन मुलींचा अपघाती मृत्यू झाला आहे. देशात धक्कादायक अपघातांच्या मालिकेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

देशात विविध अपघाताच्या घटनांमधील तीन मुलींचा अपघाती मृत्यू झाला आहे. देशात धक्कादायक अपघातांच्या मालिकेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 जानेवारी : देशात विविध अपघाताच्या घटनांमधील तीन मुलींचा अपघाती मृत्यू झाला आहे. पहिला अपघात हा दिल्लीतील कंझावला रोडवर झाला. पहिल्या अपघातातील युवतीची कवटी पूर्णपणे फुटली होती, ब्रेन मॅटर गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. 20 वर्षीय अंजलीच्या या अहवालात अशा भयानक आणि गंभीर जखमांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसरी घटना ग्रेटर नोएडातील आहे. या अपघातात कार चालकाने चाकात अडकलेल्या तरुणीला तब्बल 12 किमीपर्यंत फरफटक नेलं.

यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर तीच्यासोबत आणखी दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेची नोएडा आणि परिसरात जोरदार चर्चा झाली होती. तर तिसरी घटना ही चेन्नईतील आहे. आपल्या भावाला सोडण्यासाठी जाताना खड्डा चुकवताना शोबनाचा मृत्यू झाला आहे. ती खड्डा चुकवताना मोपेडवरून खाली पडली अन् तीच्या अंगावरून ट्रक गेल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. या तीन्ही घटना मागच्या चार दिवसात घडल्याने देश अपघाताच्या घटनांनी हादरला आहे.

राजधानी दिल्ली अपघाताने हादरली

बहुचर्चित कंझावला रस्ता अपघातात मृत्यू झालेल्या अंजली सिंहचा ऑटोप्सी रिपोर्ट समोर आला असून, त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंजली सिंहच्या ऑटोप्सी अहवालात असं नमूद केलं आहे की तिची कवटी पूर्णपणे फुटली होती, ब्रेन मॅटर गायब होते, पाठीचा कणा फ्रॅक्चर होता आणि तिच्या शरीरावर एकूण 40 जखमा होत्या. 20 वर्षीय अंजलीच्या या अहवालात अशा भयानक आणि गंभीर जखमांचा उल्लेख करण्यात आला आहे.

1 जानेवारी रोजी अंजलीच्या स्कूटीला धडक देत कारने तिला कित्येक किलोमीटर फरफटत नेलं, त्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि तिच्या शरीराचीही भयानक अवस्था झाली. मौलाना आझाद मेडिकल कॉलेज (एमएएमसी) येथील डॉक्टरांच्या वैद्यकीय बोर्डाने तिच्या शरीराची ऑटोप्सी केली आणि अंजलीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. MAMC रिपोर्टमध्ये दिल्ली पोलिसांना अंजलीच्या गायब असलेल्या "ब्रेन मॅटर" बद्दल माहिती दिली आहे.

हे ही वाचा : अपघाताच्या 5 दिवसानंतर ऋषभ पंतला मुंबईला हलवणार, क्रिकेटरच्या प्रकृतीबद्दल मोठी Update

आयटी हब ग्रेटर नोएडामध्ये भयानक अपघात

ग्रेटर नोएडामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवणाऱ्या तरुणाने तीन विद्यार्थ्यांना धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान दिल्लीतील घटनेने आधीच देश हादरला आहे. या अपघातात कार चालकाने चाकात अडकलेल्या तरुणीला तब्बल 12 किमीपर्यंत फरफटक नेलं. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

आता ग्रेटर नोएडामधून समोर आलेल्या बातमीनुसार, बीटेकच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी या अपघातानंतर कोम्यात गेली. विद्यार्थिनीच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. याशिवाय तिच्या पायालाही गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या तरुणी आयसीयूमध्ये दाखल आहे. आणि जिवनाशी झुंज देत आहे. तरुणीचं नाव स्वाती कुमारी आहे. कार चालकाने  विद्यार्थिनीला धडक दिल्यानंतर फरार झाले. पोलिसात या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

एका खड्ड्याने घेतला तरुणीचा जीव

चेन्नईजवळील रस्त्यावरील खड्डा टाळण्याचा प्रयत्न करत असताना एका 22 वर्षीय युवतीला ट्रकने धडक दिली यामध्ये तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना चेन्नईतील मदुरावायलजवळ घडली असून पोलिसांनी घटनास्थळावरून पळून गेलेला ट्रक चालक मोहन याला अटक केली आहे. शोभना असे पीडित तरुणीचे नाव असून ती झोहो या खासगी कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होती. ती तिच्या भावाला त्याच्या NEET कोचिंग क्लाससाठी शाळेत सोडण्यासाठी जात होती यावेळी तीचा अपघात झाला.

हे ही वाचा : धनंजय मुंडेंच्या कारला मोठा अपघात, एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवणार; अपघातग्रस्त कारचा धक्कादायक Video

मदुरावायल येथे भला मोठा खड्डा चुकवण्याच्या युवतीला तोल सावरता न आल्याने ती आणि तीचा भाऊ मोपेडवरून खाली पडले. यावेळी मागे असणारा ट्रक न थांबल्याने दुर्दैवाने, ट्रक तिच्या अंगावरून गेला. यात शोबना जागीच ठार झाली तर तिचा भाऊ बाजूला पडला असल्याने थोडक्यात बचावला दरम्यान या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Accident, Bike accident, Major accident, Road accidents, Road accidents in india