मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /वैतागलेल्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक कृत्य; बॉयफ्रेंडच्या अंगावर 3 वेळा घातली कार, दिला भयानक मृत्यू

वैतागलेल्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक कृत्य; बॉयफ्रेंडच्या अंगावर 3 वेळा घातली कार, दिला भयानक मृत्यू

मॉरिसला तिच्या बॉयफ्रेंडचे इंडियानापोलिसमधील लोकेशन सापडलं. तेव्हा तो एका पबमध्ये होता आणि त्याच्यासोबत दुसरी मुलगी होती.

मॉरिसला तिच्या बॉयफ्रेंडचे इंडियानापोलिसमधील लोकेशन सापडलं. तेव्हा तो एका पबमध्ये होता आणि त्याच्यासोबत दुसरी मुलगी होती.

मॉरिसला तिच्या बॉयफ्रेंडचे इंडियानापोलिसमधील लोकेशन सापडलं. तेव्हा तो एका पबमध्ये होता आणि त्याच्यासोबत दुसरी मुलगी होती.

नवी दिल्ली 08 जून : प्रेमात फसवणूक झालेल्या तरुणीने प्रियकराची निर्घृण हत्या केली (Woman Killed Boyfriend). प्रियकराला मारण्यासाठी तिने Apple AirTag चा वापर केला. अमेरिकेच्या सुप्रसिद्ध इंडियानापोलिस शहरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. तरुणीने दुसऱ्या एका युवतीला मारण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता.

Tripura : महिनाभरापासून गायब होता तरुण, मृत समजून घरच्यांनी केले श्राद्ध मात्र...

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, मॉरिसला तिच्या बॉयफ्रेंडचे इंडियानापोलिसमधील लोकेशन सापडलं. तेव्हा तो एका पबमध्ये होता आणि त्याच्यासोबत दुसरी मुलगी होती. मॉरिसने सांगितलं की ती स्मिथची गर्लफ्रेंड होती. ती पुढे म्हणाली की स्मिथ तिची फसवणूक करत होता (Cheating in Love). इंडियानापोलिस मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाच्या तपासकर्त्यांनी सांगितलं की, जेव्हा मॉरिस तिथे आली तेव्हा तिने प्रियकर आंद्रे स्मिथसोबत भांडण सुरू केलं. वाद सुरू असताना मॉरिसने दारूच्या रिकाम्या बाटलीने स्मिथसोबतच्या तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

स्मिथने हा हल्ला रोखला आणि या तरुणीच्या हत्येचा मॉरिसचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यानंतर तिघांना पबमधून बाहेर काढण्यात आलं. पबमधून बाहेर येताच मॉरिस आपल्या कारमध्ये बसली आणि रस्त्यावरुन चाललेल्या आंद्रेला तिने कारने धडक दिली. ती आंद्रेला तोपर्यंत गाडीखाली चिरडत राहिली, जोपर्यंत त्याचा जीव गेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉरिसने आंद्रेच्या अंगावर तीन वेळा कार चढवली आणि उतरवली.

Nanded : मुलीच्या उपचारासाठी नव्हते पैसे, पित्याने उचलले 'हे' टोकाचे पाऊल

Apple Airtags नाण्याच्या आकाराचं एक डिव्हाईस आहे, जे चावी, बॅकपॅक्स, पर्स आणि इतर वस्तूंसोबत जोडता येतं. यामुळे लोकांना iPhone च्या माध्यमातून समोरच्याला ट्रॅक करता येतं, जेणेकरून कोणी अडचणीत असेल तर त्याला मदत करता यावी. AirTag एक आणि चार पॅकमध्ये क्रमशः : 3190 रुपये आणि 10900 रुपयांत खरेदी करता येतं.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder, Relationship