Home /News /crime /

Nanded : मुलीच्या उपचारासाठी नव्हते पैसे, पित्याने उचलले 'हे' टोकाचे पाऊल

Nanded : मुलीच्या उपचारासाठी नव्हते पैसे, पित्याने उचलले 'हे' टोकाचे पाऊल

आपल्या मुलीच्या उपचारासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत होते. त्यांनी यासाठी कर्जही काढले होते.

  नांदेड, 7 जून : अनेकदा गरिबीमुळे माणूस हताश होतो. आर्थिक परिस्थितीमुळे बेताची असल्यामुळे त्याला नैराश्य (Depression) येते. याचमुळे व्यक्ती अनकदा चुकीची पाऊले टाकतो. अशीच एक धक्कादायक घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यातून समोर आली आहे. मुलीच्या औषधोपराचासाठी (Medicines and Treatement) पैसे नसल्याने एक पिता हताश झाला होता. यातूनच त्याने एक धक्कादायक पाऊल उचलले. काय आहे घटना - मुलीच्या औषध आणि उपचारासाठी पैसे नसल्याने हताश झाल्याने एका पित्याने विष पिवून आत्महत्या (Father Suicide) केल्याची घटना घडली. दीपक पुंजाराम खंदारे, असे आत्महत्या केलेल्या या व्यक्तिचे नाव आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील आष्टी येथे घडली. मृत दीपक खंदारेंना दोन मुली असून त्यातील एक मनोरुग्ण आहे. आपल्या मनोरुग्ण मुलीवर योग्य ते उपचार केले जावेत आणि तीसुद्धा इतर मुलींसारखी सर्वसामान्य व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. आपल्या मुलीच्या उपचारासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत होते. त्यांनी यासाठी कर्जही काढले होते. मात्र, तरीसुद्धा तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. तिच्यावर पुढील उपचारासाठी आणखी पैशांची गरज होती. मात्र, पु़ढच्या उपसारासाठी दीपक खंदारे यांच्याकडे पैसे नव्हते. आपल्या मुलीवर आता उपचार कसे करावेत, त्यासाठी पैसे कुठून आणावेत, या तणावात होते. या तणावाच्या कारणामुळे खंदारे हे नशेच्या सुद्धा आहारी गेले होते. हेही वाचा - लग्नाचं आमिष देवून अल्पवयीन मुलीसोबत गाठला विकृतीचा कळस; नंतर सोशल मीडियावरही...
  अखेर त्यांनी एक टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी शेतात जावून विष पिले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. मुलीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने एका पित्याने आत्महत्या केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. खंदारे यांच्या असहाय्य कुटुंबाला आता आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अर्थसहाय्य करावे, असे आवाहन दीपक खंदारे यांच्या पत्नी रेखा खंदारे यांनी केले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Nanded, Suicide news

  पुढील बातम्या