लखनऊ 01 मार्च : एका मुलीसाठी आपले आई-वडील सर्वकाही असतात, असं अनेकदा आपण ऐकलं असेल. मात्र, काही घटना अशाही समोर येतात, ज्या पुरतं हादरवून सोडतात. बांदा जिल्ह्यात 26 फेब्रुवारी रोजी एका मध्यमवयीन व्यक्तीच्या झालेल्या हत्येचा खळबळजनक खुलासा पोलिसांनी मंगळवारी केला. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली मृताची मुलगी आणि तिच्या प्रियकरासह अन्य एका तरुणाला अटक केली आहे. असं सांगितलं जात आहे की, मृताच्या मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं, परंतु वडिलांना ते मान्य नव्हतं आणि ते त्यांच्यामध्ये अडथळा होते. 16 पेक्षा जास्त वेळा चाकूने वार, लग्नाला नकार अन् बॉयफ्रेंडने तिचा विषयच संपवला! याच कारणामुळे मुलीने वडिलांना वाटेमध्ये हटवण्याचा कट रचला आणि तिच्या प्रियकराने मित्रासह तिच्या वडिलांचा लाठ्या-कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केला. या प्रकरणी पोलिसांनी मृताची मुलगी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या साथीदाराला अटक करून तुरुंगात पाठवलं आहे. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी त्याच गावातील रहिवासी मोतीलाल यादव यांचा रक्ताने माखलेला मृतदेह बिसांडा पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रवल गावाबाहेरील शेतात पडलेला आढळला होता. त्यानंतर लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी मृताचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्याचवेळी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते. तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली, ज्यामध्ये कळालं की मृताच्या मुलीनेच तिच्या प्रियकरासह मिळून वडिलांच्या हत्येचा कट रचला होता. रात्री 12 वा. मेसेज, प्रेयसीसोबत शरीरसंबंध; तेवढ्यात काकाचा फोन आला अन्… या घटनेची माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितलं की, मृताच्या मुलीने 25 फेब्रुवारी रोजी तिचा प्रियकर आणि त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने वडिलांची हत्या केली. कारण त्यांच्या प्रेमप्रकरणात बापच अडसर ठरत होता. वडिलांना मार्गातून बाजूला काढण्यासाठी तिने वडिलांची हत्या केली. मृत व्यक्तीचा फोन आणि तुटलेलं सीमकार्डही या मुलीकडून जप्त करण्यात आलं आहे. यानंतर कसून चौकशी केल्यावर तिने आपला गुन्हा मान्य केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







