बंगळुरू, 1 मार्च : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीची चाकू भोसकून हत्या केली. प्रियकराने प्रेयसीवर चाकूने तब्बल 16 वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बंगळुरू येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. बंगळुरू शहर पूर्व विभागाचे डीसीपी भीमाशंकर एस गुलेद यांनी सांगितले की, मृत प्रेयसीचे नाव लीला पवित्रा नीलमणी (25, काकीनाडा, आंध्रप्रदेश) तर आरोपी प्रियकराचे नाव दिनकर बनाला (28) आहे. प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने आरोपीने तिची 16 हून अधिक वार करून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीची आणि तिच्या प्रियकराची जात वेगळी होती. भिन्न जातीतील असल्याने मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. दरम्यान, 28 वर्षीय आरोपी प्रियकराने मंगळवारी संध्याकाळी पूर्व बंगळुरूमधील मुरुगेशपल्या येथे तिच्या कार्यालयाबाहेर चाकूने हल्ला करत तिची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणी ही मुरुगेशपल्यातील ओमेगा हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करायची. त्याचवेळी आरोपी दिनकर बनाला हा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील एका आरोग्य सेवा कंपनीत कर्मचारी आहे. लीला जेबी नगर येथील पीजीमध्ये राहत होती. तर दिनाकर डोमलूर येथे राहत होता. रात्री 12 वा. मेसेज, प्रेयसीसोबत शरीरसंबंध; तेवढ्यात काकाचा फोन आला अन्… दिनकर आणि लीला हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांसोबत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दिनकर आणि लीला यांची पहिली भेट एका हेल्थकेअर फर्ममध्ये झाली. दोघेही इथे एकत्र काम करायचे. काही महिने भेटल्यानंतर आणि बोलल्यानंतर दोघेही प्रेमात पडले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण मुलगा दुसऱ्या जातीचा असल्याने मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. लीलाने दिनकरला सांगितले होते की, तिचे कुटुंब लग्नासाठी सहमत होणार नाही आणि ती तिच्या कुटुंबाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नाही. यामुळे आरोपी संतापला. त्यामुळे त्याने मंगळवारी संध्याकाळी आरोपी दिनकरने प्रेयसीच्या मैत्रिणीच्या कार्यालयाबाहेर हत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.