उन्नाव, 27 फेब्रुवारी : यूपीच्या उन्नाव जिल्ह्यात 23 फेब्रुवारीला सकाळी एका तरुणीचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी हा अपघात असल्याचे वाटले होते. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी अपहरण आणि सामूहिक बलात्कारानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत निषेध केल्याने खळबळ उडाली. यानंतर एसपी सिद्धार्थ शंकर मीणा यांनी पाळत ठेवण्यासाठी आणि स्वाट सह 3 पथकांकडे याप्रकरणाचा तपास सोपवला. पोलीस तपासात मृताच्या मोबाईलवरून आरोपी प्रियकर पिंटू रावतच्या व्हॉट्सअॅप चॅटचा बॅकअप घेतला असता आरोपीचा सुगावा लागला. यानंतर पोलिसांनी आरोपी प्रियकर पिंटूला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, मुलीची मित्रांसह कारने चिरडून हत्या केली. याप्रकरणी 2 आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती एसपी सिद्धार्थ शंकर मीणा यांनी दिली. हत्येचे कारण काय - याप्रकरणी आरोपी पिंटू रावतने पोलीस चौकशीत सांगितले की, 23 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजण्याच्या सुमारास प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून त्याने घराबाहेर भेटण्यासाठी बोलावले. प्रेयसी आल्यानंतर आम्ही दोघांनी बराच वेळ संवाद केला. तसेच यावेळी शारिरीक संबंधही ठेवले. मात्र, नंतर मैत्रिणीच्या काकांचा फोन आला. फोन आल्यानंतर घरच्यांच्या भीतीने तिने घरातून पळून जाण्याबरोबरच लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. खूप समजावूनही ती घरी जाण्यास तयार झाली नाही. त्यामुळे समाजाच्या भीतीने मित्रांशी बोलून तिच्या हत्येचा कट रचला. संपत्तीचा वाद अन् मुलीवर वाईट नजर, पत्नीने पतीसह दोन्ही मुलांचा विषयच संपवला असा रचला प्रेयसीच्या हत्येचा कट - आरोपी पिंटू रावतने पोलिसांना सांगितले की, प्रेयसीची समजूत घालत त्याने तिला आपल्या गाडीत बसवले. यानंतर घरी जाण्यासाठी रवाना झाले. त्याचवेळी आखलेल्या कटानुसार, रस्ता ओलांडत असताना त्याने आधी प्रेयसीला त्याच्या कारने धडक दिली, त्यानंतर मागून येणाऱ्या मित्राने तिला कारने चिरडले. यानंतर दोघांनी तेथून पळ काढला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.