पुणे 17 जानेवारी : नारायणगावजवळील वडगाव कांदळी येथील शेतात 13 जानेवारी रोजी गळा आवळून एका महिलेची हत्या करण्यात आली होती. हत्या करण्यात आलेल्या महिलेच्या मृतदेहाजवळ पडलेल्या दुपट्ट्यावरील उत्पादन बार कोड आणि दुकानाच्या नावाने या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे. जिल्हा ग्रामीण पोलिसांनी यावरुन आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. पोलिसांनी रविवारी सांगितलं, की रोजंदारी करणारा शुभम गुलस्कर (22) आणि कामगार कंत्राटदार मिथिलेश यादव (32) यांच्या अटकेनंतर या हत्येचा शोध लागला. महिलेचे एकाचवेळी या दोघांसोबतही संबंध होते, असं तपासकर्त्यांनी सांगितलं. “यादव हा मूळचा बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील आहे. पीडितादेखील त्याच ठिकाणची आहे. ती अहमदनगरमध्ये काम करायची. गुलस्कर हा अहमदनगरचा रहिवासी आहे,” अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. या दोघांनी महिलेच्या हत्येचा कट रचला होता, कारण त्यांचं अनेकदा भांडण होत असे आणि ती पैशांची मागणी करत असे, असं पोलिसांनी सांगितलं. आरोपींनी पीडितेच्या दुपट्ट्याचा वापर करून तिचा गळा दाबून खून केला. विवाहित, 3 वर्षांचा मुलगा तरीही केली एक चूक; सुखी आयुष्याचं स्वप्न पाहणाऱ्या ममताचा धक्कादायक शेवट नारायणगाव पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक पृथ्वीराज ताटे म्हणाले, “अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या स्थानिक प्रक्रिया केलेल्या तंबाखूचं पाऊच आणि मृतदेहाजवळ सापडलेल्या दुपट्ट्यावरील उत्पादनाचा बार कोड याशिवाय आमच्याकडे पीडितेची ओळख पटवण्यासाठी दुसरा कोणताही सुगावा नव्हता. आम्ही प्रोडक्ट बार कोड स्कॅन केल्यावर आम्हाला यश मिळालं आणि ते अहमदनगरमधील एका स्टोअरचं असल्याचं समजलं. ते पुढे म्हणाले, की आमच्या टीमने अहमदनगर येथील मार्केटमध्ये जाऊन चौकशी केली, यासोबतच महिलेचा फोटो मार्केटमध्ये फिरवला. यादरम्यान, काही लोकांनी आमच्या तपासकर्त्यांना सांगितलं की त्यांनी 12 जानेवारी रोजी बाजारात महिलेला शेवटचं पाहिलं होतं. ती यावेळी एका तरुणासोबत होती. लग्नाचे आमिष देऊन 23 वर्षीय वार्डबॉयचे 30 वर्षाच्या नर्ससोबत धक्कादायक कृत्य, सतत दोन वर्ष… ताटे म्हणाले, “आमच्या टीमने गुलस्कर हाच महिलेसोबत शेवटचा दिसलेला व्यक्ती असल्याचं ओळखलं. आम्ही त्याला शनिवारी त्याच्या अहमदनगर येथील घरातून ताब्यात घेतलं. सखोल चौकशीत त्याने यादवसोबत मिळून महिलेची हत्या केल्याचं कबूल केलं.” त्यांनी तपासाचा हवाला देत सांगितलं की, “गुलस्कर आणि यादव हे दोघेही विवाहित आहेत, परंतु त्यांचे त्या महिलेशी संबंध होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की, ही महिला त्यांच्याशी अनेकदा भांडण करायची आणि पैशाची मागणी करायची, त्यामुळे त्यांनी तिच्या हत्येचा कट रचला. त्यांनी तिला वडगाव-कांदळी येथे आणलं. 12 जानेवारी रोजी पैसे देण्याच्या बहाण्याने तिची दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केली. ताटे म्हणाले की, बिहारमधील पीडितेच्या नातेवाईकांना तिच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आणि मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. खुनासह अन्य गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.