मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /विवाहित, 3 वर्षांचा मुलगा तरीही केली एक चूक; सुखी आयुष्याचं स्वप्न पाहणाऱ्या ममताचा धक्कादायक शेवट

विवाहित, 3 वर्षांचा मुलगा तरीही केली एक चूक; सुखी आयुष्याचं स्वप्न पाहणाऱ्या ममताचा धक्कादायक शेवट

ममता विवाहित असूनही तिचं आणि अरमानचं अफेअर सुरू होतं,

ममता विवाहित असूनही तिचं आणि अरमानचं अफेअर सुरू होतं,

ममता विवाहित असूनही तिचं आणि अरमानचं अफेअर सुरू होतं,

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Jharkhand, India

    राजगड, 16 जानेवारी : गेल्या काही दिवसांमध्ये झारखंडमधील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. विशेषत: प्रेमप्रकरण आणि अवैध संबंधांमध्ये यश न मिळाल्यानं खून होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मकर संक्रातींच्या रात्री राजगड जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. प्रेमात अपयशी ठरलेल्या प्रियकरानं आपल्या विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. हजारीबागमधील रामगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. अरमान खान उर्फ रॉकी बाबा नावाच्या व्यक्तीनं 14 जानेवारी रोजी विवाहित प्रेयसी ममताचा जीव घेतला. ‘एशियानेट न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार ममता विवाहित होती आणि तिला तीन वर्षांचा मुलगा आहे. ममता विवाहित असूनही तिचं आणि अरमानचं अफेअर सुरू होतं, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. आरोपी तिला आपल्यासोबत येण्यासाठी दबाव टाकत होता. घटनेच्या दिवशीही तो तिला घेण्यासाठी आला होता. मात्र, ममतानं त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्यानं तो तिच्याशी भांडू लागला. त्याने तिला बेदम मारहाण केली.

    या भीषण घटनेबाबत मृत ममताची बहीण जया हिने आरोपी अरमानविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. जया यांनी सांगितलं की, गेल्या 15 दिवसांपासून ते सर्व कुटुंबासह दिल्लीत ममताकडे गेले होते. काही दिवसांपूर्वी ते परतले होते. यादरम्यान अरमान ममताला भेटण्यासाठी हजारीबागला पोहोचला. 14 जानेवारी रोजी ममता घरी एकटीच होती. घरी आलेल्या अरमानशी तिचं भांडण झालं. त्यानंतर त्याने ममताला मारहाण करून गंभीर जखमी केलं. कुटुंबीय घरी परत आले तेव्हा ममता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. घाईघाईत कुटुंबीयांनी तिला रामगड येथील रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

    हेही वाचा - लग्नाचे आमिष देऊन 23 वर्षीय वार्डबॉयचे 30 वर्षाच्या नर्ससोबत धक्कादायक कृत्य, सतत दोन वर्ष...

    या प्रकरणाचा तपास करत असलेले बरकाकाना ओपीचे प्रभारी शशी प्रकाश यांनी सांगितलं की, मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. हे लव्ह ट्रँगलचं प्रकरण आहे. आरोपी आणि मृत तरुणीचे प्रेमसंबंध होते. तिचं लग्नही झालेलं होतं. ती पती रंजनसोबत दिल्लीत राहत होती. तिचा पती रंजन यालाही ममताच्या अफेअरची माहिती होती. दोघांमध्ये अफेअरवरून वादही होत होते. अशा परिस्थितीमध्ये आरोपी अरमानसुद्धा ममताला धमकावून तिला आपल्याकडे बोलावत होता. काही दिवसांपूर्वी ती हजारीबाग येथील वडिलांच्या घरी आली होती. येथेच आरोपी अरमाननं तिची हत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.

    First published:

    Tags: Crime news, Murder news, Women extramarital affair