मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अंजलीला फरफटत नेणाऱ्या कारचा मालक पोलिसांना सापडला; आरोपींना अशी केली होती मदत

अंजलीला फरफटत नेणाऱ्या कारचा मालक पोलिसांना सापडला; आरोपींना अशी केली होती मदत

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. आता सुलतानपुरी-कांझावाला प्रकरणातील आणखी एक आरोपी आशुतोषला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. आता सुलतानपुरी-कांझावाला प्रकरणातील आणखी एक आरोपी आशुतोषला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. आता सुलतानपुरी-कांझावाला प्रकरणातील आणखी एक आरोपी आशुतोषला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली 06 जानेवारी : सध्या दिल्लीतल्या कांझवाला इथलं 'हिट अँड रन' प्रकरण देशभरात चर्चेचा विषय आहे. एका ग्रे बलेनो कारने 20 वर्षीय अंजलीला सुलतानपुरी इथे धडक देऊन कांझवालापर्यंत फरपटत नेलं होतं. हे अंतर 12 किलोमीटर इतकं होतं. या घटनेत अंजलीचा मृत्यू झाला. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. आता सुलतानपुरी-कांझावाला प्रकरणातील आणखी एक आरोपी आशुतोषला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पीसीआर व्हॅनसह 10 वाहनं करत होती आरोपींच्या कारचा पाठलाग; पण.., अंजली मृत्यू प्रकरणात नवा दावा

आऊटर जिल्हा पोलिसांनी ही अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 1 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजून 33 मिनिटांनी रोहिणीतील सेक्टर 1 मध्ये पोहोचले होते. यावेळी सहावा आरोपी आशुतोषही तिथे होता. आरोपींनी आधीच फोन करून आशुतोषला अपघाताबाबत माहिती दिली होती. त्यामुळे त्याने आरोपींना पळून जाण्यासाठी ऑटोची व्यवस्था करून दिली होती.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही नुकताच समोर आला होता. ज्यामध्ये आरोपी कारमधून उतरताना दिसतात. यानंतर यातील एक तरुण कारखाली वाकून पाहतो आणि मग ते एका ऑटोजवळ जाऊन उभा राहतात. याप्रकरणात एकूण सात आरोपींचा सहभाग असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू आहे.

अंजलीला फरफटत नेल्यानंतर कारमधून उतरले होते आरोपी; मग गाडीखाली पाहिलं अन्.., नवा CCTV VIDEO

दरम्यान पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपींच्या कारने मुख्य रस्त्याऐवजी आडमार्गाचा वापर केल्याचं समोर आलं आहे. ग्रे बलेनो कारचा माग काढण्यासाठी पीसीआर व्हॅन आणि नाइट पेट्रोलिंग युनिटसह किमान 10 वाहनं ड्युटीवर होती; मात्र दाट धुक्यामुळे तत्काळ माग काढला आला नाही, असं पोलीस सूत्रांनी पीटीआयला सांगितलं होतं. या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन गोष्टींचा खुलासा होत आहे. त्यामुळे अपघात झाला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? पीडित अंजली आणि तिची मैत्रीण यांचे संबंध कसे होते? त्या रात्री अंजली मद्यधुंद अवस्थेत होती का? मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेऊनही अपघात करणारी कार लवकर का सापडली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

First published:

Tags: Accident, Delhi