नवी दिल्ली 05 जानेवारी : देशाची राजधानी दिल्लीत असलेल्या कांझावाला येथे वर्षाच्या पहिल्याच दिवशी 20 वर्षीय अंजली सिंगचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. घटनेत एका कारने अंजलीच्या स्कूटीला धडक दिली. त्यानंतर जवळपास 10 ते 12 किलोमीटर ती कारसोबत फरफटत गेली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. आता या घटनेशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. शरिरावर 40 जखमा, छिन्नविछिन्न मृतदेह 12 किमी फरफटत गेला, कसा आणि कुठे झाला अपघात सुलतानपुरी प्रकरणातील पाचही आरोपी बलेनो कारमधून खाली उतरतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. याच कारने अंजलीला 12 किलोमीटर फरफटत नेलं होतं. आता समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुलतानपुरी प्रकरणातील आरोपी बलेनो कारमधून खाली उतरताना दिसत आहेत. कारमधून खाली उतरल्यानंतर एक आरोपी कारच्या मागे जाऊन काहीतरी करताना दिसतो.
या प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांनी माहिती दिली, की दिल्ली पोलिसांचा तपास सध्या निर्णायक वळणावर आहे. 18 पथके कार्यरत आहेत. गुन्हेगारी स्थळी भेट दिली आहे.
सुलतानपुरी प्रकरणातील पाचही आरोपी बलेनो कारमधून खाली उतरतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. याच कारने अंजलीला 12 किलोमीटर फरफटत नेलं होतं. pic.twitter.com/j4M4b9OGkw
— News18Lokmat (@News18lokmat) January 5, 2023
5 आरोपी कोठडीत आहेत. यात आणखी दोन जणांचा समावेश असून, तपास सुरू आहे. अमित गाडी चालवत होता याचे शास्त्रीय पुरावे आमच्याकडे आहेत. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. ते आता आम्ही तपासत आहे. तपास सुरू असून सीसीटीव्हीच्या वेळेची तपासणी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दिल्लीसारखीच आणखी एक घटना! कारची डिलिव्हरी बॉयला धडक; गाडीसोबतच फरफटत नेलं, तरुणाचा मृत्यू दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाबाबत अंजलीची मैत्रिण निधी हिचा जबाबही नोंदवला आहे. आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रत्यक्षदर्शींचे जबाब महत्त्वाचे पुरावे ठरतील, असे पोलिसांनी सांगितले. यासोबतच आणखी काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहेत, ज्यामुळे रविवारी रात्री घडलेल्या घटनांचा क्रम निश्चित करण्यात मदत होईल.