मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पीसीआर व्हॅनसह 10 वाहनं करत होती आरोपींच्या कारचा पाठलाग; पण.., अंजली मृत्यू प्रकरणात नवा दावा

पीसीआर व्हॅनसह 10 वाहनं करत होती आरोपींच्या कारचा पाठलाग; पण.., अंजली मृत्यू प्रकरणात नवा दावा

पोलिसांना चकमा देण्यासाठी या कारने मुख्य रस्त्याऐवजी आडमार्गाचा वापर केल्याचं समोर आलं आहे. ग्रे बलेनो कारचा माग काढण्यासाठी पीसीआर व्हॅन आणि नाइट पेट्रोलिंग युनिटसह किमान 10 वाहनं ड्युटीवर होती

पोलिसांना चकमा देण्यासाठी या कारने मुख्य रस्त्याऐवजी आडमार्गाचा वापर केल्याचं समोर आलं आहे. ग्रे बलेनो कारचा माग काढण्यासाठी पीसीआर व्हॅन आणि नाइट पेट्रोलिंग युनिटसह किमान 10 वाहनं ड्युटीवर होती

पोलिसांना चकमा देण्यासाठी या कारने मुख्य रस्त्याऐवजी आडमार्गाचा वापर केल्याचं समोर आलं आहे. ग्रे बलेनो कारचा माग काढण्यासाठी पीसीआर व्हॅन आणि नाइट पेट्रोलिंग युनिटसह किमान 10 वाहनं ड्युटीवर होती

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    नवी दिल्ली 05 जानेवारी : सध्या दिल्लीतल्या कांझवाला इथलं 'हिट अँड रन' प्रकरण देशभरात चर्चेचा विषय आहे. एका ग्रे बलेनो कारने 20 वर्षीय अंजलीला सुलतानपुरी इथे धडक देऊन कांझवालापर्यंत फरपटत नेलं होतं. हे अंतर 12 किलोमीटर इतकं होतं. पोलिसांना चकमा देण्यासाठी या कारने मुख्य रस्त्याऐवजी आडमार्गाचा वापर केल्याचं समोर आलं आहे. ग्रे बलेनो कारचा माग काढण्यासाठी पीसीआर व्हॅन आणि नाइट पेट्रोलिंग युनिटसह किमान 10 वाहनं ड्युटीवर होती; मात्र दाट धुक्यामुळे तत्काळ माग काढला आला नाही, असं पोलीस सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे.

    या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन गोष्टींचा खुलासा होत आहे. त्यामुळे अपघात झाला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? पीडित अंजली आणि तिची मैत्रीण यांचे संबंध कसे होते? त्या रात्री अंजली मद्यधुंद अवस्थेत होती का? मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेऊनही अपघात करणारी कार लवकर का सापडली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 'हिंदुस्तान टाइम्स'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    अंजलीला फरफटत नेल्यानंतर कारमधून उतरले होते आरोपी; मग गाडीखाली पाहिलं अन्.., नवा CCTV VIDEO

    निधी नावाच्या मैत्रिणीला कुटुंबीय ओळखत नाहीत

    अपघाताच्या वेळी अंजलीसोबत उपस्थित असलेली निधी या प्रकरणातली प्रमुख साक्षीदार आहे. निधीने पोलिसांना माहिती दिली आहे, की अपघाताच्या रात्री अंजली मद्यधुंद अवस्थेत होती आणि तिनं जबरदस्तीने स्कूटर चालवली होती; मात्र अंजलीच्या कुटुंबीयांनी हे फेटाळून लावलं आहे. अंजलीच्या तोंडून कधीही निधी नावाच्या मैत्रीणीबद्दल आम्ही ऐकलं नाही, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. अंजलीची आई रेहा देवी यांनी पत्रकारांना सांगितलं, की अंजली कधीही दारू प्यायची नाही. ती कधीही दारूच्या नशेत घरी आली नव्हती. अंजलीच्या फॅमिली डॉक्टरांनी बुधवारी (4 जानेवारी) सांगितलं, की निधी खोटं बोलत आहे. शवविच्छेदन अहवालात अंजलीच्या पोटात अल्कोहोल आढळलेलं नाही.

    निधी अंजलीची मैत्रीण आहे तर ती लवकर समोर का आली नाही?

    पोलिसांना तत्काळ माहिती न दिल्यानं निधीच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अंजलीच्या कुटुंबीयांनीदेखील निधीच्या वर्तणुकीबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. निधी अंजलीच्या सोबत होती तर तिला रस्त्यावर सोडून ती लगेचच आपल्या घरी का परतली? अंजलीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ती समोर का आली, असे प्रश्न अंजलीच्या कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत. "ती तेव्हा घाबरली होती, तर आता तिला भीती नाही वाटत का? हा निधीनं रचलेला कट होता," असं अंजलीचे मामा म्हणाले आहेत. निधीच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, निधी 2.30 वाजता घरी परतली होती. म्हणजेच अपघातानंतर लगेचच ती घरी गेल्याचं सिद्ध होत आहे.

    अंजलीला 4 किंवा 12 नाही, तर 40 किलोमीटर फरफटत नेलं; सीन रिक्रिएट करताच हादरवणारा खुलासा

    केवळ 15 दिवसांची ओळख

    निधीनं पोलिसांना सांगितलं आहे, की 31 तारखेच्या रात्री त्या पहिल्यांदाच एकत्र बाहेर गेल्या होत्या. दोघी फक्त 15 दिवसांपासून एकमेकींना ओळखत होत्या. अंजली आणि निधी एका हॉटेलमध्ये पार्टीत सहभागी होण्यासाठी गेल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. अंजली आणि निधी यांच्या नावाने एक रूम बुक करण्यात आली होती. हॉटेल रूम बुक करण्यासाठी त्यांनी आपलं आधार कार्ड वापरलं होतं. हॉटेलमधल्या पार्टीत त्या सात जणांशी बोलताना दिसल्या होत्या. या सात जणांची पोलिसांनी चौकशी केली आहे.

    31 डिसेंबरच्या मध्यरात्री झालेल्या या अपघातामध्ये अंजलीला 40 जखमा झाल्या होत्या. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, अंजली कारच्या समोरच्या बाजूच्या डाव्या चाकात अडकली होती. आरोपींच्या कारने सुलतानपुरी ते कांजावाला असं सुमारे 12 किलोमीटर अंतर तिला ओढत नेलं. तिचा डोक्याचा भाग चाकात अडकल्यानं तिच्या मेंदूचा काही भाग नाहीसा झाल्याचं आढळलं आहे.

    एका पोलीस व्हॅनला अपघातग्रस्त स्कूटी आढळली. तिथे कोणीही नसल्याने अपघात झालेल्या व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेल्या असाव्यात असा अंदाज बांधला गेला होता. अपघाताच्या रात्री पोलीस नियंत्रण कक्षात अनेक कॉल्स आल्यानंतर कारचा शोध घेण्यासाठी एकूण 10 पोलीस व्हॅन तपासासाठी बाहेर पडल्या होत्या. कांजावाला, होशांबी बॉर्डर आणि अमन विहार इथल्या तीन पीसीआर व्हॅनचा त्यामध्ये समावेश होता. अपघात होऊन जवळपास 12 तास उलटल्यानंतर रविवारी दुपारी बलेनो कार सापडली.

    First published:
    top videos

      Tags: Delhi News, Road accident