मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; नदीत 100 किमी दूर फेकला मृतदेह

अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; नदीत 100 किमी दूर फेकला मृतदेह

मृतदेह बाईकवरून सवाईमाधोपुरपासून 100 किलोमीटरवर कोटा येथे चंबल नदीत फेकला. कुटुंबाची दिशाभूल करत ती बेपत्ता झाल्याचं त्याने सर्वांना सांगितलं.

मृतदेह बाईकवरून सवाईमाधोपुरपासून 100 किलोमीटरवर कोटा येथे चंबल नदीत फेकला. कुटुंबाची दिशाभूल करत ती बेपत्ता झाल्याचं त्याने सर्वांना सांगितलं.

मृतदेह बाईकवरून सवाईमाधोपुरपासून 100 किलोमीटरवर कोटा येथे चंबल नदीत फेकला. कुटुंबाची दिशाभूल करत ती बेपत्ता झाल्याचं त्याने सर्वांना सांगितलं.

कोटा, 23 जानेवारी : संशयातून एका तरुणाने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका युवकाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवत, आपल्या आत्याच्या लग्न झालेल्या मुलीशी लग्न केलं. त्यानंतर तिचं बाहेरही अफेअर असल्याच्या संशयातून तिची हत्या (Love and Murder) केल्याची घटना घडली आहे.

हत्या करणाऱ्या व्यक्तीने, हत्या केल्यानंतर पत्नीचा मृतदेह बाईकवर बांधून 100 किलोमीटर दूर नेऊन, चंबल नदीमध्ये फेकला. एवढंच नाही, तर त्याने कुटुंबिय आणि पोलीसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी पत्नीच्या मावशीच्या नवऱ्यावर तिला पळवून नेल्याचा गुन्हाही दाखल केला.

कोटा पोलीस अधिकारी शरद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास दोन महिन्यांपूर्वी चंबल नदीमध्ये एका 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना त्या महिलेची हत्या तिचा पती नरेश मीणाने केली असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नरेश मीणाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

(वाचा - आजी रॉक्स बाकी सगळे शॉक, 89व्या वर्षी चालवली नातवाची हुंदई कार! पाहा हा VIDEO)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश मृत महिलेचा मामेभाऊ आहे. आधीच लग्न झालेल्या महिलेने आपल्या पतिला सोडून नरेशसोबत विवाह केला. अशाप्रकारे केलेल्या लग्नानंतर समाजात होणाऱ्या छळामुळे दोघेही जयपूरमध्ये राहायला आले. परंतु लॉकडाउनमध्ये आर्थिक स्थिती बिकट झाल्याने दोघेही सवाईमाधोपुर येथे भाड्याने रुम घेऊन राहू लागले. याच दरम्यान तो पत्नीवर तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊ लागला. या संशयातूनच त्याने पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह एका चादरीमध्ये ठेऊन तो मोठ्या डब्ब्यात टाकला.

(वाचा - ...आणि अचानक खचला रस्ता; मधोमध पडलं भलमोठं भगदाड, पाहा हा VIDEO)

त्यानंतर मृतदेह बाईकवरून सवाईमाधोपुरपासून 100 किलोमीटरवर कोटा येथे चंबल नदीत फेकला. कुटुंबाची दिशाभूल करत ती बेपत्ता झाल्याचं त्याने सर्वांना सांगितलं. त्या महिलेच्या आई-वडिलांनी जवळपास दिड महिन्यांनंतर सवाईमाधोपुरमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. त्यानंतर नरेशनेही मृत पत्नीच्या मावशीच्या पतीविरोधात तिला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांच्या कठोर प्रश्नोत्तरांना उत्तर देताना, सखोल तपासानंतर अखेर त्यांने हत्येची कबुली दिली. नरेशला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील करत आहेत.

First published:

Tags: Murder