...आणि अचानक खचला रस्ता; मधोमध पडलं भलमोठं भगदाड, पाहा हा VIDEO

...आणि अचानक खचला रस्ता; मधोमध पडलं भलमोठं भगदाड, पाहा हा VIDEO

रस्ता अचानक खचल्यानंतर, रस्त्याच्या मधोमध मोठं भगदाड पडलं आहे. अचानक रस्ता खचल्यामुळे, समोरून येणारी रिक्षा थेट 20 फूट खड्ड्यात पडली.

  • Share this:

जयपूर, 23 जानेवारी : जयपूरमधील चोमू सर्कल येथे रस्ता खचल्याची घटना घडली आहे. रस्ता अचानक खचल्यानंतर, रस्त्याच्या मधोमध मोठं भगदाड पडलं आहे. अचानक रस्ता खचल्यामुळे, समोरून येणारी रिक्षा थेट 20 फूट खड्ड्यात पडली. रिक्षा इतक्या उंचावरून खड्ड्यात पडल्याने रिक्षा चालक आणि महिला प्रवासी जखमी झाली आहे.

चोमू सर्कलवर नाल्यामध्ये लिकेज झाल्याने, रस्त्या खचून मधोमध मोठं भगदाड पडल्याची माहिती मिळत आहे. रस्त्याच्या मधेच इतकं मोठं भगदाड झाल्याची कोणतीच कल्पना नसल्याने समोरून येणारी रिक्षा थेट 20 फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात रिक्षा चालक आणि आत बसेलली एक महिला प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

(वाचा - छोट्या गावात राहणाऱ्या शेंगदाणे विकणाऱ्याच्या मुलानं केलं चक्क वर्ल्ड रेकॉर्ड)

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रिक्षा चालक आणि प्रवासी महिलेला तात्काळ खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांना त्वरित सवाई मानसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जेसीबीच्या मदतीने खड्ड्यातून ऑटो रिक्षा बाहेर काढण्यात आली आहे.

(वाचा - आनंदवार्ता! हे विषाणूतज्ञ कोरोनाबद्दल जे म्हणतात ते वाचून मिळेल मोठा दिलासा)

दरम्यान, पावसाळ्यात अनेकदा रस्ता खचल्याच्या किंवा रस्ता वाहून गेल्याच्या अनेक घटना घडतात. परंतु इतक्या मोठ्या रोडवर अशाप्रकारे रस्ता खचल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या मधेच असलेला नाला लिकेज झाल्याने रस्ता खचल्याचं कारण देण्यात आलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: January 23, 2021, 10:30 AM IST
Tags: jaipur

ताज्या बातम्या