जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शीचा कोरोनाने मृत्यू! संशयित आरोपीबाबत कोर्टाने घेतला मोठा निर्णय

हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शीचा कोरोनाने मृत्यू! संशयित आरोपीबाबत कोर्टाने घेतला मोठा निर्णय

हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शीचा कोरोनाने मृत्यू! संशयित आरोपीबाबत कोर्टाने घेतला मोठा निर्णय

एका स्थानिक न्यायालयाने हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शीच्या मृत्यूनंतर आरोपीची निर्दोष मुक्तता केली. कोर्टाने म्हटलं की खून प्रकरणातील आरोपीविरुद्ध कोणताही सबळ पुरावा समोर येऊ शकला नाही

  • -MIN READ Haryana
  • Last Updated :

चंदीगड 11 सप्टेंबर : हरियाणातील गुरुग्राम येथील एका स्थानिक न्यायालयाने हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शीच्या मृत्यूनंतर आरोपीची निर्दोष मुक्तता केली. कोर्टाने म्हटलं की खून प्रकरणातील आरोपीविरुद्ध कोणताही सबळ पुरावा समोर येऊ शकला नाही, ज्यामुळे त्याने गुन्हा केल्याचं सिद्ध होऊ शकेल. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वेदप्रकाश सिरोही यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना आरोपीला केवळ संशयाच्या आधारे शिक्षा देण्याऐवजी सोडून देण्याचे आदेश दिले. 26 ऑगस्ट 2020 रोजी गुरुग्रामच्या महावीर चौकात असलेल्या औषधांच्या दुकानाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह बबलूचा असल्याची ओळख पटली. बबलूचा मित्र गौरव याने पोलिसांना सांगितलं की, बबलू आणि इतर फळ विक्रेते रात्री औषधांच्या दुकानाजवळील फूटपाथवर झोपले होते. यातीलच ओमप्रकाश नावाच्या एका फळ विक्रेत्याने मार्च 2020 मध्ये त्याच्या साथीदारांकडून अडीच हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पोलीस आणि कुटुंबीयांनी अडीच महिने घेतला बेपत्ता तरुणाचा शोध, अखेर घरातच सापडला पुरलेला मृतदेह पैसे घेतल्यानंतर ओमप्रकाश मार्चमध्ये लॉकडाऊन दरम्यान लुधियाना येथील त्याच्या घरी गेला. ऑगस्टमध्ये तो घरून परत आला. फळ विक्रेता गौरवने पोलिसांना सांगितलं की, 23 ऑगस्ट 2020 रोजी बबलू, ओमप्रकाश आणि त्याच्यात पैसे परत करण्यावरून भरपूर वाद झाला. यादरम्यान बबलूने ओमप्रकाशला चापट मारली. रागात ओमप्रकाशनेही बबलूवर वीट उचलून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र इतरांनी मध्यस्थी करून तत्काळ प्रकरण शांत केलं. यानंतर तीन दिवसांनीच बबलूचा मृतदेह सापडला. या संपूर्ण प्रकरणातील एकमेव साक्षीदार असलेल्या गौरवने आपल्या जबानीत सांगितलं की, ओमप्रकाशने त्याला आणि बबलूला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि त्यानेच ही हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच दिवशी ओमप्रकाशलाही अटक केली होती. पोलिसांनी जवळच्या गोठ्यातून पोलिसांनी एक शर्टही जप्त केला, ज्यावर रक्ताचे डाग होते. धक्कादायक! नागपुरात मध्यरात्री युवकाचा खून, गणपती विसर्जन मिरवणुकीतील DJ ठरला हत्येचं कारण खून प्रकरणातील जबाब नोंदवल्यानंतर गौरव बिहार येथील त्याच्या घरी गेला. यानंतर दुसऱ्याच वर्षी कोविडमुळे गौरवचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. बचाव पक्षाचे वकील अभिमन्यू यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की या खटल्यात इतर कोणतेही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत आणि रक्ताने माखलेला शर्ट ओमप्रकाशचा नसून सार्वजनिक ठिकाणी सापडला आहे. बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपी ओमप्रकाशची सुटका करत म्हटलं की, फिर्यादीच्या कोणत्याही युक्तिवादात न्यायालयाला योग्यता आढळली नाही आणि केवळ संशयाच्या आधारे शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात