पुणे 29 ऑगस्ट : अनेकदा माणूस क्रूरतेच्या सगळ्या हद्दी पार करतो. अशा अनेक घटना समोर येत असतात, ज्याबद्दल ऐकूनच थरकाप उडतो किंवा संताप येतो. माणसाने माणसाच्या हत्या केल्याच्या घटना तर समोर येतातच मात्र अनेकदा माणसाने पाळीव प्राण्यांसोबत केलेल्या क्रूर कृत्याच्या घटनाही ऐकायला मिळतात. पुण्यातील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. ज्यात एका प्रशिक्षकाने श्वानाचा जीव घेतला आहे. संतापजनक! बोटं घालून पत्नीचा डोळा काढला बाहेर; वारंवार माहेरी जाण्याची अशी दिली शिक्षा या घटनेत श्वानाला प्रशिक्षण देत असताना तो हातातून सुटून पळत गेला. या गोष्टीचा राग आल्याने प्रशिक्षकाने श्वानाच्या गळ्यातील साखळी जोरात ओढली. यातच श्वानाचा मृत्यू झाला. ही घटना आंबेगाव पठार- गणेशवंदन हाउसिंग सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी श्वान प्रशिक्षकावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सीताराम गोळे (वय 55) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रशिक्षकाचं नाव आहे. याबाबत सागर संजय जगताप यांनी फिर्याद दिली आहे. मृत श्वान हा फिर्यादी सागर जगताप यांनी त्यांच्या घरी पाळला होता. युरो नावाच्या या श्वानाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांनी गोळे याला दिली होती. ‘पेट्रोल संपलंय, लिफ्ट द्याल का’? महिलेनं आधी मदत घेतली, मग वृद्धाला ब्लॅकमेल करत केलं धक्कादायक कृत्य 25 ऑगस्ट रोजी गणेशवंदन हाउसिंग सोसायटी येथे प्रशिक्षक गोळे हे युरोला प्रशिक्षण देत होते. यावेळी युरो अचानक सटकून सोसायटीच्या गेटकडे पळाला. याचा राग आल्याने गोळे यांनी श्वानाला पकडून आधी क्रूरपणे लाथांनी मारहाण केली. यानंतर त्याच्या गळ्यातील साखळी जोराने ओढली. यात श्वानाचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







