रायपूर, 28 ऑगस्ट : छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातील उदयपूर पोलीस ठाणे हद्दीतून एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. येथील गावातील एका घरातील महिला वारंवार आपल्या माहेरी जात होती. यावर पती खूप संतापला होता. रागाच्या भरात त्याने पत्नीला खूप मारहाण केली. इतकच नाही तर त्याने क्रूरपणाच्या सर्व मर्यादाच ओलांडल्या. त्याने बोटं घालून पत्नीचा एक डोळा बाहेर काढला आणि सुऱ्याने तो कापला. या घटनेनंतर पती घटनास्थळाहून फरार झाला आहे. महिलेची सासू आणि दीराने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली. महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. ही घटमा सरगुजा जिल्ह्यातील एका गावात घडली. येथील देवप्रसाद नशेच्या अवस्थेत घरी पोहोचला होता. यावेळी रत्नी मानमतीसोबत कोणत्या तरी गोष्टीवरून भांडण करू लागला. आणि ती वारंवार माहेरी का जाते, यावर सवाल उपस्थित करू लागला. दोघांमधील वाद टोकाला पोहोचला. त्यावेळी देवप्रसादने पत्नीला खूप मारहाण केली. यानंतर बोटं घालून तिचा उजवा डोळा बाहेर काढला. यानंतर त्याने सुऱ्याने डोळ्याच्या नसाही कापल्या. आणि डोळा आगीत टाकला. सांगली : पतीने मोबाईलचा लॉक उघडून दिला नाही म्हणून पत्नीचं भयानक पाऊल, दुसऱ्या रुममध्ये जाऊन… या घटनेनंतर पती घटनास्थळाहून फरार झाला. सासू आणि दीराला याबाबत कळताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. महिलेला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.