अमरावती 29 ऑगस्ट : रस्त्यावर उभा असलेल्या एखाद्या व्यक्तीने लिफ्ट मागितली तर आपण माणुसकी दाखवत अनेकदा गाडी थांबवतो आणि त्या व्यक्तीला लिफ्ट देतो. मात्र, अनेकदा हा चांगुलपणाच महागात पडू शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच अमरावतीतून समोर आली आहे. या घटनेत एका महिलेनं 60 वर्षीय वृद्धाकडे मदत मागत लिफ्ट घेतली मात्र नंतर महिलेनं वृद्धालाच ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. पुणे : लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध; Video ची धमकी देऊन पत्नीला वेश्याव्यवसायात ढकललं नेमकं काय घडलं - एका महिलेनं 60 वर्षीय वृद्धाला रस्त्यात थांबवत मदत मागितली आणि सांगितलं की माझ्या गाडीतील पेट्रोल संपलं आहे, मला लिफ्ट हवी आहे. यासोबतच तिने वृद्धाकडून 400 रुपये उसणे घेतले. नंतर हे पैसे परत करण्याच्या बहाण्याने तिने वृद्धाला आपल्या घरी बोलावलं. वृद्ध घरी येताच महिलेनं आपल्या दोन मैत्रिणींच्या मदतीने त्याला डांबून ठेवलं आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. 60 हजार रूपये न दिल्यास तुझ्याविरुद्ध बलात्काराची आणि विनयभंगाची खोटी तक्रार करू, अशी धमकी महिलेनं वृद्धाला दिली. नंदकिशोर भडांगे असं या पीडित व्यक्तीचं नाव असून ते नवसारीतील नवोदय विद्यालयाजवळ राहातात. भडांगे हे रस्त्याने जात असताना एक अनोळखी महिलेनं त्यांना मदत मागितली. भडांगे यांनी महिलेला पेट्रोल पंपापर्यंत सोडलं आणि तिला 400 रुपयेही दिले. पैसे परत करण्यासाठी म्हणून महिलेनं भडांगे यांचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर तिने वृद्धाला पैसे घेण्यासाठी आपल्या घरी बोलावलं. यानंतर वृद्धाने मी बाहेर थांबतो असं सांगितलं. मात्र महिलेनं म्हटलं की माझी बहीण पैसे घेऊन येत आहे. तिने वृद्धाला घरात बोलावलं आणि दरवाजा लावून घेतला. सहा मुलांची आई होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, प्रियकराने लग्नासाठी टाळाटाळ केल्यावर रिक्षातच केला त्याचा घात यानंतर आणखी दोन महिला इथे आल्या. तिघींनी मिळून वृद्धाला आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर 60 हजार रूपये द्या अन्यथा तुमच्याविरोधात खोटी बलात्काराची तक्रार देऊ, अशी धमकी दिली. यानंतर भडांगे यांना बाथरूममध्ये बंद करून ठेवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.