अश्वनी कुमार, प्रतिनिधी झांसी, 29 जून : आपल्या जिगरी दोस्तांसोबत आपलं कित्येकदा भांडण होतं. कधीकधी भांडणांची कारणंही अतिशय क्षुल्लक असतात. मात्र काहीही असूदे, कितीही भांडण झालं तरी आपण आपल्या दोस्ताला आपल्यापासून दूर जाऊ देत नाही. परंतु हीच मैत्री उत्तर प्रदेशातील भगोले नामक व्यक्तीच्या जीवावर उठली. त्याच्या खास मित्राने त्याच्यावर कुऱ्हाडीचे सपासप वार केले. ज्यात त्याचा मृत्यू झाला आणि त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं. ही संतापजनक घटना आहे झांसी जिल्ह्यातील तांडा गावची. येथे रामचरणने आपल्या खास मित्राची रात्रीच्या अंधारात हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी रामचरणच्या मुसक्या आवळल्या आहेत, मात्र या हत्येमागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
भगोले आणि रामचरण दोघं सख्खे शेजारी होते. एका घरात जे काही शिजेल ते दुसऱ्या घरातील लोक चवीने खायचे. दोन्ही कुटुंबातील एकाच्याची पोटात एकमेकांवाचून कोणतं गुपित राहायचं नाही. एकमेकांच्या अडचणीत धावणारे हे शेजारी कायम पहिले असायचे. भगोले आणि रामचरण दोघं नेहमीप्रमाणे मंदिरात गेले होते. तिथे पहिला पूजा कोण करणार यावरून दोघांच्यात वाद झाला. हा वाद टोकाला गेला, दोघांनीही गावकऱ्यांसमोर एकमेकांसाठी अपशब्द वापरले. मात्र ज्या वेगाने वाद मोठा झाला, त्याच वेगाने तो शांतही झाला. दोघांनीही मनोभावे पूजा केली आणि हसतखेळत घरी आले. आपापल्या कामाला लागले. दोघांमधला वाद मिटला, असंच वाटत होतं. मात्र भगोलेला कल्पनाही नव्हती की मित्राच्या मनात आपल्याबाबत प्रचंड राग भरलेला आहे. तर, दुसरीकडे रामचरण मात्र वर-वर वातावरण शांत आहे असं दाखवून त्याच्या कपटी मनात भगोलेच्या हत्येचा कट रचत होता. सिमेंटच्या मिक्सरमध्ये सफाई करायला दोघे गेले अन् मशीन झालं सुरू, भयानक घडलं त्याच रात्री भगोले शांत झोपलेल्या असताना रामचरणने अंधारात त्याच्या घरात घुसून त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. हे वार भगोलेला सोसले नाहीत. त्याने जागीच जीव सोडला. दरम्यान, याप्रकरणी रामचरणला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. तर, या घटनेने पूर्ण गाव सुन्न झाला आहे. सख्ख्या मित्रावरही विश्वास ठेऊ नये, असं लोक बोलू लागले आहेत.