चंदीगड 12 नोव्हेंबर : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकरानेही धक्कादायक पाऊल उचललं. फरिदाबादमध्ये प्रेयसीची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा आरोप असलेल्या तरुणाने जिल्हा न्यायालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. जखमी तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलीस आता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार असल्याची चर्चा आहे. महेंद्र असं मृताचं नाव असून त्याच्यावर प्रेयसी रोशनीच्या हत्येचा आरोप आहे. फरिदाबाद पोलिसांनी त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यासाठी नेले होते. दरम्यान, संधी मिळताच महेंद्र कोर्टाच्या सहाव्या मजल्यावर पोहोचला. मग तिथून त्याने उडी मारली. इतक्या उंचीवरून उडी मारल्याने महेंद्रला खूप दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शेजाऱ्याचा कुत्रा भुंकल्याने भडकला माजी कृषी अधिकारी, रागात गोळीबार केला अन्…, बीडमधील धक्कादायक घटना आरोपी महेंद्रने प्रेयसी रोशनीच्या हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यासोबतच त्याने त्यामागचं कारणही सांगितलं. महेंद्रने सांगितलं की, रोशनी काही महिन्यांपासून त्याच्याशी बोलत नव्हती. यामुळे तो संतापला होता. त्याने गुरुवारी रोशनीला बहाण्याने घरी बोलावून तिला मारहाण केली. रोशनीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. त्यानंतर तो तिला बळजबरीने निर्जनस्थळी घेऊन गेला, तेथे त्याने रोशनीवर धारदार शस्त्राने अनेक वार केले. यामुळे रोशनी गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपी महेंद्रने घटनास्थळावरून पळ काढला. रात्रभर रोशनी गंभीर अवस्थेत तिथेच राहिली. सकाळी एका वाटसरूने तिला पाहिले असता रोशनीने त्याच्या मदतीने आपल्या भावाला फोन करून सर्व प्रकार सांगितला. रोशनीचा भाऊ घटनास्थळी पोहोचला तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. आई लग्न लावून देत नसल्याने नाराज झाला मुलगा; हॉरर चित्रपट बघून रचला भयानक कट, अन्… या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर आरोपी महेंद्रला अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पोलीस आरोपीला घेऊन कोर्टात पोहोचले तेव्हा त्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दुसरीकडे प्रत्यक्षदर्शी अभिषेक भामला यांनी सांगितले की, मी कोर्टात पहिल्या मजल्यावर होतो. तेवढ्यात अचानक खूप मोठा आवाज झाला. मी खाली बघितले तर एक तरुण पडला होता. मी खाली आलो आणि मित्रांच्या मदतीने त्याला बाजूला बसवले. त्यानंतर पोलीस आले आणि त्याला रुग्णालयात नेलं. नंतर त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.