जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / आई लग्न लावून देत नसल्याने नाराज झाला मुलगा; हॉरर चित्रपट बघून रचला भयानक कट, अन्...

आई लग्न लावून देत नसल्याने नाराज झाला मुलगा; हॉरर चित्रपट बघून रचला भयानक कट, अन्...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आरोपी अनेकदा यूट्युबवर हॉरर चित्रपट पाहत असे. त्याने हॉरर चित्रपट बघूनच आईला जीवे मारण्याची योजना तयार केली. यासाठी त्याने घरात ठेवलेली क्रिकेटची बॅट व लोखंडी रॉडचा वापर केला

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    भोपाळ 10 नोव्हेंबर : लग्न लावून न दिल्याच्या रागातून एका माथेफिरू मुलाने आपल्याच वृद्ध आईची हत्या केली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीनं आईला क्रिकेटच्या बॅटनं मारहाण केली. हॉरर चित्रपट पाहून आईच्या हत्येचा कट या आरोपी मुलाने रचला होता. भोपाळमधील कोहेफिजा भागातील खानू गावात राहणाऱ्या अस्मा फारुकी यांना अताउल्लाह आणि अब्दुल अहद फरहान अशी दोन मुलं आहेत. मंगळवारी मोठा मुलगा अताउल्ला खान पत्नीसह अशोका गार्डन येथे त्याच्या सासरी गेला होता. त्यामुळे घरात अस्मा फारुकी आणि त्यांचा लहान मुलगा अब्दुल अहद फरहान हे दोघेच होते. जेव्हा मोठा मुलगा घरी परतला तेव्हा त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. जखमी आईला घेऊन तो रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी तपासणी करून अस्मा यांना मृत घोषित केलं. छतावरून पडल्याने आई जखमी झाल्याचं अस्मा यांचा लहान मुलगा अब्दुल यानं सांगितले. अब्दुलनं दिलेल्या माहितीवरून पोलीस या संपूर्ण प्रकरणाला अपघात म्हणून ग्राह्य धरलं. कुटुंबाचं हादरवणारं पाऊल; या कारणामुळे एकाच घरातील 6 जणांनी घेतलं विष मात्र, मृत अस्मा फारुकी यांचा शॉर्ट पीएम रिपोर्ट आल्यानंतर हा अपघात नसून हत्येचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर पोलिसांनी दोन्ही भावांची कसून चौकशी केली. त्यावेळी मोठा भाऊ अताउल्ला घराबाहेर होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. अताउल्ला बाहेर होता त्यावेळी अब्दुल घरीच होता. पोलिसांनी अब्दुलची कसून चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं आईची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. अतिरिक्त डीसीपी रामस्नेही मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल सुशिक्षित आहे. त्याचं बी.कॉमपर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्याने आईच्या हत्येचा गुन्हा कबूल केला आहे. याबाबत सर्व पुरावे गोळा केले गेले आहेत. आरोपी अनेकदा यूट्युबवर हॉरर चित्रपट पाहत असे. त्याने हॉरर चित्रपट बघूनच आईला जीवे मारण्याची योजना तयार केली. यासाठी त्याने घरात ठेवलेली क्रिकेटची बॅट व लोखंडी रॉडचा वापर केला. अब्दुलनं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर : संपत्तीचा वाद, पत्नीसोबत मिळून वडिलांसोबत केलं भयानक कांड लग्न लावून न दिल्याच्या कारणामुळे आरोपी अब्दुल त्याच्या आईवर रागावला होता. यावरून घरात वादही झाला होता. त्याने 15 मिनिटे आईवर सतत हल्ला केला, अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे. अब्दुल मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. या कारणामुळेच त्याचं लग्न होत नव्हतं. त्याची आईसुद्धा त्याला या गोष्टीची जाणीव करून देत होती. म्हणून त्याने आईचा खून केला, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात मोठ्या मुलाचाही हात असल्याचा आरोप मृत अस्मा फारुकी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, त्याच्या विरुद्ध पोलिसांना काहीही पुरावे मिळाले नाहीत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात