बीड 12 नोव्हेंबर : बीडमधून एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. यात एका माजी कृषी अधिकाऱ्याच्या कृत्याने सगळ्यांनाच हादरवलं आहे. शेजाऱ्याच्या घरील कुत्रा भुंकल्याने भडकलेल्या माजी कृषी अधिकाऱ्याने अतिशय धक्कादायक कृत्य केलं. माझ्यावर जो भुंकतो त्याला मी ठोकतो असं म्हणत माजी कृषी अधिकाऱ्याने रागाच्या भरात कुत्र्यावरच गोळ्या झाडल्या. हा गंभीर प्रकार बीडच्या परळी वैजनाथ शहरातून समोर आला आहे. 2 राज्यांचे पोलीस शोधत आहेत चोरीला गेलेली चप्पल; नेमकं प्रकरण तरी काय? कुत्र्यावर निर्दयीपणे गोळ्या झाडणाऱ्या माजी अधिकाऱ्याचं नावं रामराज कारभारी घोळवे असं आहे.. या अधिकाऱ्या घरासमोरच विकास हरिभाऊ बनसोडे यांचं हॉटेल आहे. त्यांचा कुत्रा मोठ्याने भुंकत होता. कुत्र्याचं भुंकणं ऐकून हा अधिकारी चिडला. पाठलाग करुन कुत्र्याला गोळ्या घालण्यासाठी अधिकारी थेट हॉटेलजवळ गेला. या अधिकाऱ्याने हॉटेलच्या पार्किंगमध्ये जात कुत्र्याचा पाठलाग केला. यानंतर या अधिकाऱ्याने आपल्या जवळच्या पिस्तुलमधून कुत्र्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत बंदुकीची गोळी लागून कुत्रा जागेवर ठार झाला. या घटनेनं एकच खळबळ उडाली. प्रेमप्रकरणातून भिवंडीतल्या युवकाची घृणास्पद हत्या, कारण ऐकून व्हाल हैराण कुत्र्याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या हॉटेल मालकाने या अधिकाऱ्याला याबाबत जाब विचारला. यावर ‘मला जो भुंकतो त्याला मी ठोकतो’ असं उत्तर अधिकाऱ्याने दिलं. अधिकाऱ्याचं उत्तर ऐकून मालकाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळे हॉटेलमधील कर्मचारीदेखील भयभयीत झाले आहेत. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाने तक्रार केली आहे. त्यानुसार या माजी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.