जयपुर, 23 मे : राजस्थानच्या (Rajasthan News) जयपूरच्या मानसरोवर पोलीस ठाण्यात मृत तरुणाच्या वडिलांनी सूनेविरोधात मुलाची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सासरच्या मंडळींना झोपेच्या गोळ्या देऊन हत्या (Killed Husband) केल्याचा आरोप महिलेवर लावण्यात आला आहे. या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं की, रवी (21) बीएच्या प्रथम वर्गाचा विद्यार्थी आहे. याचं लग्न सुमन (19) हिच्यासोबत नोव्हेंबर 2020 मध्ये लावून देण्यात आलं होतं. सुमन बारावीत असल्या कारणाने लग्नानंतरही ती माहेरीच राहत होती. ती केव्हा तरी सासरी येत होती. रवीची बहीण आणि अन्य कुटुंबीयांनी सांगितलं की, 12 मार्च रोजी सुमन माहेराहून रवीसोबत सासरी आली होती. सुमनने रात्रीचा स्वयंपाक केला. आणि गव्हाच्या कणकेत झोपेच्या गोळ्या मिसळल्या. ती मात्र रात्री जेवली नाही. रवीच्या बहिणीने पुढे सांगितलं की, रात्री साधारण 12.30 वाजता दार उघडल्याचा आवाज आला होता. सकाळी साधारण 7 वाजेपर्यंत दादा-वहिणींची खोली आतून बंद होती. आवाज दिल्यानंतरही कोणी दार उघडलं नाही. काही वेळानंतर सुमनने खोलीत येऊन भावाबद्दल सांगितलं. सर्वजण त्यांच्या खोलीत गेले तर तेथे रवी बेशुद्धावस्थेत होता. त्याच्या गळ्यावर जखमांच्या खुणा होत्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सुनमवर आरोप आहे की, ती रवीच्या हत्येचं प्लानिंग करून आली होती. गव्हाच्या कणकेत झोपेच्या गोळ्या घालून तिने आधी सर्वांना झोपायला लावलं. आणि कोणी व्यक्तीने रात्री उशिरा घरात घुसून भावाची हत्या केली. ज्या दिवशी ती घरी आली होती. त्याच दिवशी भावाचा मृत्यू झाला. त्या दिवशी खोलीत ते दोघेच होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.