Home /News /videsh /

पतीला परदेशात घेऊन जाण्याची दोन्ही बहिणींना अट; ऐकलं नाही म्हणून गोळी घालून हत्या

पतीला परदेशात घेऊन जाण्याची दोन्ही बहिणींना अट; ऐकलं नाही म्हणून गोळी घालून हत्या

दोन बहिणींच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे.

  Two sisters Murder In Pakistan: पाकिस्तानमध्ये (Pakistan News) दोन बहिणींच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. दोन्ही बहिणी मूळत: पाकिस्तानी असून स्पेनच्या नागरिक होत्या. शुक्रवारी त्यांच्याच घरात दोघींचा मृतदेह आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

  अटक केलेल्यांमध्ये सासू आणि पतीदेखील सामील आहेत. मृत झालेल्या दोन बहिणींचं नाव आरजू अब्बास आणि अनीसा अब्बास आहे. गेल्या वर्षी दोघी फिरण्यासाठी पाकिस्तानात आपल्या काकाकडे आल्या होत्या. येथे परंपरेच्या नावाखाली दोघींचं चुलत भावांसोबत लग्न लावून देण्यात आलं होतं.

  गोळी मारण्यापूर्वी त्यांना टॉर्चर करण्यात आलं होतं.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पाकिस्तानातील गुजरात जिल्ह्यातील आहे. गेल्या शुक्रवारी पोलिसांना एकाच घरात दोघींचे मृतदेह सापडले होते. प्राथमिक तपासात दोघींची गोळी घालून हत्या करण्यात आल्याचं दिसलं होतं. गोळी मारण्यापूर्वी दोघींना अत्यंत निघृणपणे टॉर्चर करण्यात आलं होतं. हे त्यांच्या शरीरावरील खुनांवरुन दिसत होतं.

  स्पेनला जाण्यासाठी चुलत भावांनी केलं होतं लग्न... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर सासरचे आणि घरच्यांनी हा नियम ठेवला होता की, दोघी बहिणी स्पेनमधील कायद्याचा फायदा उचलत आपआपल्या पतींना तेथील व्हिजा मिळवून देतील. पाकिस्तानातून निघून त्या दोघांना स्पेनमध्ये आरामात राहायचं होतं आणि तेथून काही पैसे पाकिस्तानात आपल्या कुटुंबीयांना पाठवायचे होते. मात्र स्पेनला जाणं शक्य होत नव्हतं. सासरच्या मंडळींना वाटत होतं की, दोन्ही तरुणी मुद्दाम व्हिजा प्रोसेस उशिराने करीत आगहेत. यावर त्यांचे दोघींसोबत वाद झाले. शेवटी काकाने दोन्ही बहिणींची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime news, Pakisatan

  पुढील बातम्या