नाशिक, 23 मे : पती-पत्नीमधील भांडणं (Husband Wife Dispute) काही नवीन नाहीत. पती-पत्नी भांडणात नंतर गोड होतात. अनेक पती-पत्नींमध्ये वाद हे होतच असतात. मात्र, काही वेळा या वादाचे रुपांतर अनपेक्षित असेही होते. पती-पत्नीमधील वाद किंवा भांडण विकोपाला जाऊन अनर्थ घडल्याच्या बातम्याही (Husband Wife Dispute News) तुम्ही वाचल्या असतील. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पती-पत्नीचा वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की, यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
नेमकं काय घडलं -
पती विनाकारण मारहाण करायचा. या कारणामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. यानंतर पत्नी घरी पुन्हा परत यावी, यासाठी पती तिला घ्यायला तिच्या माहेरी गेला होता. मात्र, यावेळी एक अनपेक्षित घटना घडली. पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या या पतीने आपल्या सासूसाच खून केला. (Murder of Mother in Law) त्याने आपल्या पत्नीवर आणि सासूवर विळ्याने हल्ला केला. (Attack on Murder in Law and Wife) यात सासूबाई कमळाबाई सोमा भुतांबरे (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पतीने केलेल्या या हल्लात पत्नी इंदुबाई किसन पारधी आणि त्यांची 12 वर्षाची मुलगी माधुरी ही जखमी झाली आहे.
रागाच्या भरात पत्नीला मारहाण अन्...
इंदुबाईच्या पतीला दारुचे व्यसन होते. (Addicted Husband) याचमुळे कंटाळून ती आपल्या मुलीला माधुरीला घेऊन माहेरी आली होती. तिचे माहेर झारवड हे आहे. मात्र, रविवारी तिचा पती किसन तेथे आला. यावेळी त्याने आपली पत्नी इंदुबाईला घरी येण्याबाबत आग्रह केला. मात्र, ती नकार देत होते. याचमुळे यावरुन पुन्हा पती-पत्नीत भांडण सुरू झाले. रागाच्या भरात आरोपी किसनने पत्नीला मारहाण केली. यावेळी हे भांडण मिटवण्याचा सासू कमळाबाई आणि मुलगी माधुरीनेही प्रयत्न केला. मात्र, किसनने कमळाबाई यांच्या पोटात आणि पाठीवर कात्रीने तसेच विळ्याने वार केले. यात सासू कमळाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder news, Nashik, Wife and husband