Home /News /crime /

'हिंदू मुलानं हिंदू मुलीसोबत खोटं बोलणंही जिहादच; लवकरच आणणार कायदा'

'हिंदू मुलानं हिंदू मुलीसोबत खोटं बोलणंही जिहादच; लवकरच आणणार कायदा'

हिंदू मुलानं हिंदू मुलीसोबत बोललेलं खोटंही जिहादच (Hindu Boy Lying to a Hindu Girl is Also Jihad) आहे, आम्ही त्याविरूद्ध कायदा (Law) आणू, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

    गुवाहाटी 11 जुलै : हिंदुत्व एक जीवनशैली आहे, असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी म्हटलं आहे. बहुतेक धर्मांचे अनुयायी हिंदूंचे वंशज आहेत, असा दावा त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानं पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं, की हिंदुत्वाची सुरुवात 5,000 वर्षांपूर्वी झाली होती आणि ते थांबवता येणार नाही. ते म्हणाले, हिंदुत्व हा एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. मी किंवा इतर कोणी हे कसं थांबवू शकतो? जवळपास आपण सर्वच हिंदूंचे वंशज आहोत. नागपुरच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती; एक ब्रेकअप आणि तीन मर्डरचा थरार हिंदुत्व थांबवता येणार नाही, कारण त्याचा अर्थ आपल्या मातृभूमीपासून दूर जाणं असा होईल, असं ते म्हणाले. लव्ह जिहादच्या मुद्दय़ाबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी या शब्दावर आपला आक्षेप असल्याचे सांगितले. मात्र, कोणालाही एका महिलेची फसवणूक करू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. ते म्हणाले, हिंदू मुलानं हिंदू मुलीसोबत बोललेलं खोटंही जिहादच (Hindu Boy Lying to a Hindu Girl is Also Jihad) आहे, आम्ही त्याविरूद्ध कायदा (Law) आणू. हत्येसाठी गुगल मॅपची घेतली मदत; लग्नाच्या अवघ्या 15 दिवसात तरुणीने पतीला संपवलं ते म्हणाले, की सरकार एखाद्या मुलानं तरुणीला किंवा महिलेला दिलेला धोका माफ करणार नाही, मग तो हिंदू असो किंवा मुस्लीम. आपल्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. मतदार संघाच्या विकासासाठी आमदार जबाबदार आहेत, असे विधान केल्याबद्दल विरोधकांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, शर्मा यांनी असा दावा केला की भारतीय संविधान हेच ​​सांगतं आणि विधानसभेत या संदर्भात आमदार मंत्र्यापेक्षाही वरचढ असतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Assam, Love jihad

    पुढील बातम्या